शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
5
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
6
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
7
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
8
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
9
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
10
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
11
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
12
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
13
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
14
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
15
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
16
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
17
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
18
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
19
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
20
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

मागविला मोबाइल, आला साबण पार्सल उघडताना काढा व्हिडीओ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 11:06 IST

Amravati : दिवाळीची ऑनलाइन खरेदी करताना जरा जपूनच, अन्यथा होऊ शकते फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : गतवर्षी एका अमरावतीकराने ई-कॉमर्स वेबसाइटवरून दिवाळीच्या काळात एक महागडा मोबाइल मागवला. अधिक सूट मिळत असल्याने त्याने मोबाइलची संपूर्ण रक्कमदेखील आगाऊ भरली. दहा दिवसांनी डिलिव्हरी बॉय आला. तो पार्सल देऊन गेला. त्यांनी पार्सल उघडून पाहिले असता, मोबाइलच्या डब्यात मोबाइल नव्हे, तर साबणाची वडी आढळली. डिलिव्हरी घेतेवेळी व्हिडीओ न काढल्याने कंपनीने हात वर केले अन् त्या बापुड्याचे लाखभर रुपये बुडाले. यंदा देखील दिवाळी तोंडावर आली आहे. त्यामुळे ऑनलाइनखरेदी करताना ती थोडी जपूनच करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दिवाळी जवळ येत आहे आणि या आनंदाच्या सणाच्या काळात अनेकजण त्यांच्या कुटुंबासोबत हा उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, या उत्साही वातावरणात घोटाळेबाजही सक्रिय होत असतात. किंबहुना झाले आहेत. सणासुदीच्या काळात ऑनलाइनखरेदीमध्ये झालेली वाढ ही घोटाळेबाजांसाठी सुवर्णसंधी ठरते. अनेक फसवणूक करणाऱ्या वेबसाइट्स, अविश्वसनीय ऑफर आणि अनपेक्षित ई-मेलच्या माध्यमातून ग्राहकांना फसवण्याचे काम हे स्कॅमर्स करतात. अशा परिस्थितीत, आपली आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. 

काही फसव्या ऑफर्सी दिवाळीच्या काळात स्कॅमर्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अविश्वसनीय सवलती देतात. ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त सूट असलेल्या ऑफर्स पाहून ग्राहक आकर्षित होतात. अनेकदा, हे घोटाळे फसव्या वेबसाइट्स किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे होतात. अशा घोटाळ्यांमध्ये ग्राहक उत्पादनांसाठी ऑर्डर देतात; परंतु उत्पादन कधीही त्यांच्या हातात पोहोचत नाही. दिवाळीच्या काळात ऑनलाइन खरेदीवर अधिक भर दिला जात आहे. दिवाळी कॅश करण्यासाठी अनेक कंपन्या सरसावल्या. ऑनलाइन खरेदी करताना सावधानता बाळगा, नाही तर ऐन दिवाळीतच आपले दिवाळे निघू शकते. 

कस्टमर केअर नंबर शोधताना घ्या काळजी कुठल्याही कंपनीची कुठलीही सेवा हवी असेल तर त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तिथे जो कस्टमर केअर नंबर दिलेला असतो त्यावर नेहमी कॉल करावा. गुगल सर्चमध्ये येणारे नंबर फेक असू शकतात हे ध्यानात ठेवले पाहिजे. क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा 'पिन देऊ नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

काय काळजी घ्याल? 

  • सुरक्षित वेबसाइट : ऑनलाइन खरेदी ही सुरक्षित अशा वेबसाइटवरूनच करा. ज्या ई-कॉमर्स कंपन्यांची वेबसाइट अधिकृत आहेत, त्यालाच प्राधान्य द्या.
  • अनोळखी लिंक टाळा: खरेदी झाल्यानंतर आर्थिक तपशील भरताना काळजी घ्यावी. आपल्या बँकेची खरी वेबसाइट लिंक दिलेली असेल तरच त्याचे तपशील भरावेत. 
  • बँक खाते, कार्डचा तपशील सांभाळा : कोणत्याही वेबसाइटवर तुमचा 'आधार क्रमांक' किंवा 'बँक खाते क्रमांक किंवा तुमच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित गुप्त क्रमांक नोंदवू नका.
  • अनोळखी अॅप टाळा : कंपनीची किवा वेबसाइटची सत्यता तपासून पाहावी. संबंधित वेबसाइटवर त्याबाबतची काय माहिती देण्यात आलेली आहे, हे आपण पाहू शकतो. 

तर तीन तासांत करा सायबरकडे तक्रारसायबर गुन्हेगाराने फसवल्याचे कळताच सायबर पोलिस ठाण्यात कॉल करावा. त्यानंतर सायबर यंत्रणा लगेचच कामाला लागते आणि अवघ्या ७ ते ८ मिनिटांत ट्रान्सफर झालेली रक्कम होल्ड केली जाते. 

अशी टाळा फसवणूक "मागविण्यात आलेले पार्सल उघडताना त्याचा व्हिडीओ करा. पार्सल उघडताना त्यात असलेल्या वस्तू डॅमेज असतील, तर ते व्हिडीओमध्ये रेकॉर्ड होईल. कॅश ऑन डिलिव्हरीच उत्तम."- नवीनचंद्र रेड्डी, पोलिस आयुक्त

टॅग्स :AmravatiअमरावतीonlineऑनलाइनShoppingखरेदी