अचलपूर-परतवाड्यात कॅबला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 06:00 AM2019-12-20T06:00:00+5:302019-12-20T06:00:38+5:30

अचलपूर शहरातील चौधरी मैदानावरून आणि परतवाडा शहरातील मुगलाईतपुरा बैतुल स्टॉप-गुजरीबाजार येथून सकाळी ११ वाजता या मुक मोर्चास सुरुवात झाली. २५ ते ३० हजार मुस्लिम बांधव सहभागी झाले. विविध संघटनांच्या निवडक प्रतिनिधींतर्फे एकत्रितपणे अचलपूरचे एसडीओ संदीप कुमार अपार यांना निवेदन देण्यात आले.

Cab opposition in Achalpur-backyard | अचलपूर-परतवाड्यात कॅबला विरोध

अचलपूर-परतवाड्यात कॅबला विरोध

Next
ठळक मुद्देमुस्लिम बांधव एकवटले : दंगा नियंत्रण पथकासह शस्त्रधारी पोलीस तैनात

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा-अचलपूर : अचलपूर- परतवाडा शहरातील मुस्लिम बांधवांनी एकत्र येत मुकमोर्चाद्वारे सुधारित नागरिकत्व कायद्यास विरोध दर्शविला. यात हा कायदा रद्द करण्याची मागणी पुढे करीत अचलपूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना एक निवेदन दिले. अचलपूर शहरातील चौधरी मैदानावरून आणि परतवाडा शहरातील मुगलाईतपुरा बैतुल स्टॉप-गुजरीबाजार येथून सकाळी ११ वाजता या मुक मोर्चास सुरुवात झाली. २५ ते ३० हजार मुस्लिम बांधव सहभागी झाले. विविध संघटनांच्या निवडक प्रतिनिधींतर्फे एकत्रितपणे अचलपूरचे एसडीओ संदीप कुमार अपार यांना निवेदन देण्यात आले.
अचलपूरचे काजी सैय्यद ग्यासोद्दीन, जमाते इस्लामी हिंदचे मो. कबीर हनफी, तब्लिक जमातचे प्रतिनिधी मौलवी मुजाहिद कासीम, गरिब नवाज परतवाड्याचे इमाम व खतीब मकसूद रजा, रयतचे राहुल कडू, भारत मुक्ती मोर्चाचे अजय नन्नावरे, बुद्धिष्ट इंटरनॅशनल फोरमचे कौतिककर, संभाजी ब्रिगेडचे मंगेश मालठाणे, इरफान हाजी, डॉ. अनिल काजी हाफेज, सैफुलबारी, काजी बलिगोद्दीन गाजी, जमील सर, शमशेरखान, पठाण, नगरसेवक सल्लूभाई, माजी नगरसेवक साजिद फुलारी, मो आबीद हुसेन, हाजी हफीज, समाजसेवक एहतेशाम नबील, हाजी रफीक सेठ, असलम बंजारा, मस्तान कुरेशीसह अनेक मुस्लिम नेत्यांच्या नेतृत्वात हा मुकमोर्चा शांततेत पार पडला.
दंगा नियंत्रण पथकाच्या दोन गाड्या, राखीव पोलीस, हेल्मेटधारी पोलिसांसह बंदुकधारी पोलिसही शहरात तैनात करण्यात आले होते. क्युआरटी पथकाची एक तुकडी एसडीपीओ व एसडीओ कार्यालयावर तैनात होती. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन. स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
 

Web Title: Cab opposition in Achalpur-backyard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.