आॅनलाईन लोकमतअमरावती : घरगुती सिलिंडर गॅस रिफिलिंग व्यवसायाचा बुधवारी पर्दाफाश झाला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताजनगरातील एका घरी धाड टाकून आॅटोत गॅस भरताना आरोपींना रंगेहात पकडले. पोलिसांनी सहा सिलिंडर जप्त करून दोघांना ताब्यात घेतले.गुप्त माहितीवरून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राम गिते, पोलीस शिपाई राजेश पाटील, सुभाष पाटील, उमेश कापडे, शेखरर रामटेके, पंकज दवंडे यांनी ताज नगरातील नुरुल हसन मस्जीदजवळील रहिवासी अहमद खान वल्द हमीद खान याच्या घरी धाड टाकली. त्यावेळी तेथे दोन इसम घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस आॅटो क्रमांक एमएच २७ बीडब्ल्यू ०७०२ मध्ये अवैधरीत्या भरताना आढळून आले. पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. अहमद खान हमीद खान (४०,रा. ताजनगर न.२)व अब्दुल आरीफ अब्दुल रऊफ (४५,रा. बिसमील्लानगर) अशी त्यांची नावे आहेत.पोलिसांनी त्याच्या ताब्यातून इलेक्ट्रिक दोन गॅस पॉवरची मोटर, गॅस रिफिलिंगचा फवारणी संच, तीन भारत गॅसचे सिलिंडर, चार रिकामे सिलिंडर व एक प्लास्टिक ड्रम असा एकूण २ लाख ६ हजार ६०० रुपयांचा माल जप्त केला. याप्रकरणात नागपुरी गेट पोलिसांनी आरोपींविरुध्द जीवनाश्यक वस्तू भेसळ अधिनियम कलम ३, ७, नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास नागपुरी गेट पोलीस करीत आहे.
गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 22:11 IST
घरगुती सिलिंडर गॅस रिफिलिंग व्यवसायाचा बुधवारी पर्दाफाश झाला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताजनगरातील एका घरी धाड टाकून आॅटोत गॅस भरताना आरोपींना रंगेहात पकडले. पोलिसांनी सहा सिलिंडर जप्त करून दोघांना ताब्यात घेतले.
गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश
ठळक मुद्देसहा घरगुती सिलिंडर जप्त : गुन्हे शाखेची कारवाई