शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
4
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
5
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
6
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
7
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
8
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
9
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
10
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
11
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
12
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
13
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
14
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
15
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
16
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
18
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
19
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
20
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख

बसस्थानकातील चोरीचा २४ तासांत उलगडा; दोन चोर अटकेत 

By प्रदीप भाकरे | Updated: December 22, 2022 18:21 IST

टीम राजापेठची कारवाई

अमरावती : राजापेठस्थित बसस्थानकाहून एका प्रवाशाची ३० हजार रुपये रोख रक्कम लांबविणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. २२ डिसेंबर रोजी त्या गुन्ह्याची २४ तासांच्या आत उकल करण्यात राजापेठ पोलिसांना यश आले. अब्दुल अतीक अब्दुर रफीक (३२, रा. अलीम नगर, अमरावती), ऋषिकेश रमेश मेश्राम (२३, रा. राहुलनगर, फ्रेजरपुरा, अमरावती) व शेख सलीम शेख युसूफ (३०, रा. बडनेरा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

वाशिम येथील अभिषेक जगदीश घुगे (३८) हे २० डिसेंबर रोजी अमरावती आले होते. परत वाशिम जाण्याकरिता सायंकाळी ७.३०च्या सुमारास ते राजापेठ बस डेपो येथे आले. वाशिमच्या बसमध्ये बसले. तिकिटाचे पैसे काढण्याकरिता त्यांनी पँटच्या खिशात हात टाकला असता, त्यांना खिशात असलेले ३० हजार रुपये दिसून आले नाही. त्यांनी याबाबत राजापेठ पोलिसांत तक्रार दाखल केली. त्याअनुषंगाने राजापेठ बस डेपो परिसरात सापळा रचण्यात आला.

घटनास्थळावरून अब्दुल अतीक, ऋषिकेश मेश्राम व शेख सलीम यांना ताब्यात घेण्यात आले. उलटतपासणीदरम्यान त्यांनी घुगे यांचा खिसा कापल्याची कबुली दिली. आरोपी सराईत चोर असून ते सैलानी, हैदराबाद लाइन, नागपूर लाइन, मोठमोठे मेळावे, यात्रा, सिकंदराबाद, जयपूरमधील रेल्वे लाइनमध्ये मोबाइल चोरी, खिसे कापणे, गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी चोरी करीत असतात. अमरावतीमध्येदेखील त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. तीनही आरोपींकडून ३८०० रुपये हस्तगत करण्यात आले. डीसीपी विक्रम साळी व एसीपी पूनम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मनीष ठाकरे यांनी ही कारवाई केली

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीArrestअटकAmravatiअमरावती