शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बसच्या प्रवाशांनी बुजविले रस्त्यावरील खड्डे; खंडवा-इंदूर मार्गातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 12:00 IST

Amravati News परतवाड्याहून धारणीमार्गे खंडवा-इंदूर या राज्य महामार्ग क्रमांक ६ वरील खड्डे बुजवून खासगी बसच्या प्रवाशांसह चालक-वाहकाने पुढील प्रवासाला सुरुवात केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला.

ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

 पंकज लायदे    लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : परतवाड्याहून धारणीमार्गे खंडवा-इंदूर या राज्य महामार्ग क्रमांक ६ वरील खड्डे बुजवून खासगी बसच्या प्रवाशांसह चालक-वाहकाने पुढील प्रवासाला सुरुवात केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला. दिवाळीच्या पूर्वसंध्येला १३ नोव्हेंबर रोजी या नागरिकांचे अकल्पित श्रमदान झाले. या महत्त्वाच्या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे या मार्गाने ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. 

प्राप्त माहितीनुसार, राज्य महामार्ग क्र. ६ हा घाटवळणाचा आणि  मेळघाटच्या जंगलामधून गेला आहे. हा परिसर जंगलव्याप्त असल्यामुळे दोन वर्षांत जंगलात  कोसळलेल्या जोरदार पावसामुळे परतवाडा-धारणी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे आहेत. यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली. काही ठिकाणी खड्ड्यांनी रस्त्याची चाळण केली असल्याने नागरिकांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागासह अचलपूर, चिखलदरा, धारणी उपविभागांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. 

खासगी बसचे चालक  राशीद खां, वाहक विक्की सरोदे, प्रवाशांमध्ये पोलीस कर्मचारी राजू सोनवणे,  प्रकाश नंदवंशी, राजा ठाकूर, बबलू शरीफ, दयाल बेलकर, शे. कय्यूम, जुगल गाडेराव यांच्यासह अनेकांनी बस थांबवून दगड-मातीने अनेक मोठे खड्डे बुजविले. त्या बुजविलेल्या खड्ड्यांवरून आता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी व मेळघाटातील स्थानिक पदाधिकारी सुखरूप प्रवास करायला लागले आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गर्भवती मातांसह रुग्णांचे प्राण कंठाशी ग्रामीण भागातील गर्भवती माता व इतर रुग्णांना उपचारार्थ अमरावतीकडे नेताना या खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागतो. दरम्यान झटके सहन करावे लागतात. प्रवासात वेळ अधिक जात असल्याने रुग्णांना तातडीने उपचार मिळत नाहीत. अनेक गर्भवती मातांवर खड्ड्यांमुळे जंगलातच प्रसूतीचा प्रसंग ओढवला, तर अनेकींना जीव गमवावा लागला आहे.

रस्त्याच्या मधोमध खड्डे असल्यामुळे वाहनांचे मेन पट्टे वारंवार तुटतात. या कारणाने अपघात होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे शुक्रवारी बस थांबवून प्रवासी व आम्ही दगड-माती भरून खड्डे बुजविले. - अब्दुल रशीद, वाहनचालक

टॅग्स :state transportएसटी