शहरं
Join us  
Trending Stories
1
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
2
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
3
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
4
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
5
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
6
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
7
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
8
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
9
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
10
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
11
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
12
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
13
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
14
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
15
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
16
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
17
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
18
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
19
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
20
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं

अकोट-धारणी मार्गावर बस कलंडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 23:35 IST

एमएच १२ एच बी १९९९ ही खासगी बस अकोटवरून धारणीकडे चार वाजता येत होती. पण, ढाकणा अकोट मार्गावर ही बस दीडशे फुट खाईत चालकाच्या सतर्कतेने पडता-पडता वाचली अन् २० प्रवाश्यांचे प्राण वाचले. अकोट ते धारणी हा नागमोडीच्या घाटवळणाचा रस्ता असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याची निगा राखली जाते. या रस्त्याची  गुणवत्तेअभावी चाळणी झाली आहे. ८०  किलोमीटरचा हा घाट अतिशय धोकादायक वळणांचा आहे.

ठळक मुद्दे२० प्रवासी बचावले, घाटवळणावर चालकाचे प्रसंगावधान

लोकमत न्यूज नेटवर्कचुरणी  : मेळघाट व्याघ्र प्रकल्पात गुगामल वन्यजीव विभागातील अकोट-धारणी मार्गावर खासगी बस कलंडून दीडशे फूट खोल दरीच्या तोंडावर दोन चाकांवर उभी झाली. चालकाच्या प्रसंगावधानाने यामधील २० प्रवाशी थोडक्यात बचावले. शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास हा अपघात घडला. एमएच १२ एच बी १९९९ ही खासगी बस अकोटवरून धारणीकडे चार वाजता येत होती. पण, ढाकणा अकोट मार्गावर ही बस दीडशे फुट खाईत चालकाच्या सतर्कतेने पडता-पडता वाचली अन् २० प्रवाश्यांचे प्राण वाचले. अकोट ते धारणी हा नागमोडीच्या घाटवळणाचा रस्ता असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याची निगा राखली जाते. या रस्त्याची  गुणवत्तेअभावी चाळणी झाली आहे. ८०  किलोमीटरचा हा घाट अतिशय धोकादायक वळणांचा आहे.  आदिवासी भागात रोजगाराची कोणतीही साधने उपलब्ध नसल्यामुळे स्थलांतरित कुटुंबे ढाकणा-अकोट मार्गाचा वापर करीत आहेत. व्याघ्र प्रकल्पाच्या नियमानुसार अतिसंरक्षित जंगलात बांधकामाची कोणतीही कामे करता येत नाही. पण, गेल्या पाच-सात वर्षात या रस्त्यांवर सार्वजनिक  व जिल्हा परिषद बांधकाम विभागाने कोट्यवधीचा निधी टप्प्याटप्प्याने खर्च केला, पण अकोट-धारणी मार्गाचे भाग्य अद्याप फळफळले नाही. या  मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

 

टॅग्स :Accidentअपघात