शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरच्या सराईतांकडून मोझरीच्या घरफोडीचा उलगडा, दोघांना अटक 

By प्रदीप भाकरे | Updated: January 15, 2023 15:11 IST

नागपुरच्या सराईतांकडून मोझरीच्या घरफोडीचा उलगडा झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. 

अमरावती : तिवसा शहरालगतच्या गुरूदेवनगर येथील डॉ. रघुनाथ वाडेकर यांच्या घरी झालेल्या चोरीचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. १४ जानेवारी रोजी अटक केलेल्या नागपूरच्या दोन सराईत चोरांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून त्या चोरीतील गेलेल्या मालासह गुन्हयात वापरलेली कार देखील जप्त करण्यात आली आहे.

विक्की नथ्थु सोलंकी (२७, रा. खैरी, बुट्टीबोरी नागपूर) व गोपाल दुजेराम दिवांगण (३०, रा. सातगाव, नागपुर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. अज्ञात चोराने मोझरी येथील आपल्या बंद घराचा कोंडा तोडून घरातील कपाटामधून दागिने चोरून नेल्याची तक्रार ७ जानेवारी रोजी डॉ. रघुनाथ वाडेकर यांनी तिवसा पोलिसांत नोंदविली होती. ती चोरी विक्की व गोपाल या दुकलीने केल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. दोघांनीही वाडेकर यांच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली आरोपींकडून त्या घरफोडी गुन्हयातील दागिने तसेच गुन्हयात वापरलेली एम एच १२ एफ पी २९११ ही कार, लोखंडी टॉमी, पाच मोबाईल असा एकूण ३ लाख ६२ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ते आंतरराज्यीय चोरटेदोन्ही आरोपी हे सराईत चोर असून त्यांच्याविरूध्द भंडारा, वर्धा जिल्हयात तसेच छत्तीसगढ़ राज्यातील दुर्ग जिल्हयात घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहे. या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

ही कार्यवाही पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधिक्षक शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक मो. तस्लीम शेख गफुर व मूलचंद भांबुरकर, हवालदार पुरुषोत्तम यादव, उमेश वाकपंजार, मंगेश लकडे सचिन मसांगे, चालक संदीप नेहारे तथा सायबर सेल येथील रितेश वानखडे यांनी केली.

  

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारीArrestअटक