शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

एसटी-दुचाकी यांच्यात धडक; वडिलांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 22:51 IST

धाराकोट येथील सुनील लक्ष्मण कासदेकर हे त्यांचा मुलगा साहिल (७) याच्यासोबत दुचाकीने धारणी ते साद्राबाडी ते सावलीखेडा मार्गाने भंवर गावाकडे जात होते. यादरम्यान साद्राबाडी गावाजवळील लंगडाबाबा मंदिराजवळ धारणीकडे येत असलेली एसटी बस व दुचाकी समोरासमोर आल्याने एकमेकांना धडकल्या. सकाळी ११ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.

ठळक मुद्देचिमुकला गंभीर : साद्राबाडी ते सावलीखेडा मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : एसटी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार वडील ठार, मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील साद्राबाडी ते सावलीखेडा मार्गावर मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली. सुनील लक्ष्मण कासदेकर (३५, धाराकोट) असे मृताचे नाव आहे. साद्राबाडी गावालगतच्या लंगडाबाबा मंदिराजवळ हा अपघात घडला.धाराकोट येथील सुनील लक्ष्मण कासदेकर हे त्यांचा मुलगा साहिल (७) याच्यासोबत दुचाकीने धारणी ते साद्राबाडी ते सावलीखेडा मार्गाने भंवर गावाकडे जात होते. यादरम्यान साद्राबाडी गावाजवळील लंगडाबाबा मंदिराजवळ धारणीकडे येत असलेली एसटी बस व दुचाकी समोरासमोर आल्याने एकमेकांना धडकल्या. सकाळी ११ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातग्रस्त बाप-लेक घटनास्थळी विव्हळत पडले होते. यादरम्यान एका वाटसरूने ॉअपघाताची माहिती साद्राबाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुग्णवाहिका चालक पन्नालाल वाघमारे यांना दिली. त्यांनी घटनास्थळ गाठून दोन्ही जखमींना धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले.सुनील कासदेकर यांच्या छाती, डोके व पायाला जबर मार लागल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर साहिल याच्यावर उपचार सुरू आहेत.माझ्या बाबांना वाचवा!रुग्णवाहिका चालक पन्नालाल वाघमारे यांनी घटनास्थळावर पडून असलेल्या सुनील व चिमुकला साहिल यांना उपचाराकरिता उचलून वाहनात टाकले. त्यावेळी चिमुकल्या साहिलने माझ्याआधी बाबांना उचला, त्यांचा जीव वाचवा, अशी आर्जव केली.दुचाकीचालक हा मद्यप्राशन केलेला होता. त्याची दुचाकी त्याच्याकडून सांभाळली नाही. मी बस थांबविल्यावरही त्याने बसला धडक दिली. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बस पोलीस ठाण्यात आणली.- मो. इकबाल अ. सत्तारएसटी बसचालक

 

टॅग्स :Accidentअपघात