शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

तेलरंगांमुळे बैलांच्या शिंगांना कर्करोगाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 13:49 IST

बैलांच्या शिंगांना तेलरंग लावल्यामुळे त्यातील विषारी घटक शिंगात शोषले जातात. त्यामुळे शिंगांमध्ये जळजळ होऊन कर्करोग होतो.

ठळक मुद्देकाळजी घेण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बैलांना शिंगाच्या कर्करोगाचा धोका बळावत आहे. यामध्ये ५ ते १० वर्षे वयोगटातील जनावरांचा समावेश अधिक असल्याचे दिसून येत आहे. खच्ची केलेल्या तसेच शेती कामातील बैलांमध्ये हे प्रमाण गाईपेक्षा अधिक आहे. लक्षणे ओळखून तातडीने उपचार करणे गरजेचे असल्याचे पशुसंवर्धन उपायुक्तांचे म्हणणे आहे.जनावरांची शिंगे ही संरक्षणासोबत शरीराची शोभा वाढवतात. म्हणून शिंगांची निगा राखणे महत्त्वाचे असते. शिंगांमध्ये जळजळ होत असल्याने बैल इतरत्र शिंग घासत असल्याने इजा होऊन चार टप्प्यांत कर्करोगाची लक्षणे आढळतात. लक्षणे दिसताच त्याची पशू वैद्यकांकडून योग्य तपासणीअंती करवून घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो. जिल्हा सर्व चिकित्सालयात अशी लक्षणे अनेक गुरांमध्ये आढळल्याचेही डॉ. गोहत्रे म्हणाले.

दुसऱ्या टप्प्यातील लक्षणेशिंगे हळूहळू खाली झुकतात. शिंगांच्या बुडाला जखम होते. जखमेतून रक्त, पू निघते व घाण वास येतो. कर्करोग झालेल्या शिंगास मारून पाहिल्यास आवाजातील फरक जाणवतो.

तिसऱ्या टप्पातील लक्षणेशिंग पूर्णत: एका बाजूस झुकते. आपोआप तुटून पडते. शिंगाच्या बुडाला जखमेची वाढ झालेली दिसते. अशक्तपणा, तणाव येतो. भूक मंदावते.

कर्करोगाची कारणेशिंगांना तेलरंग लावल्यामुळे त्यातील विषारी घटक शिंगात शोषले जातात. त्यामुळे शिंगांमध्ये जळजळ होऊन कर्करोग होतो. शिंगे सोलणे किंवा घासणे, शिंगाला सतत इजा होणे, उन्हात काम करीत असताना सूर्याच्या अतिनील किरणांमुळे कर्करोग होतो. शेतात काम करीत असताना सतत शिंगाला जू घासणे, शिंगांना सतत दोर बांधून ठेवल्याने कर्करोगाची शक्यता बळावते.

कर्करोग कसा ओळखावा?पहिल्या टप्प्यातील लक्षणेटणक, कडक जागेवर शिंग घासणे. असमान शिंगे. कर्करोग झालेल्या बाजूच्या नाकपुडीतून रक्तमिश्रित स्राव. शिंगाचे बुड मऊ, गरम होते. शिंगाला वेदना होतात.

बैलांवर असे करावे उपचारलक्षणे दिसताच त्वरित पशुवैद्यकाकडून उपचार करावेत. शस्त्रक्रिया करून कर्करोगबाधित शिंग बुडापासून काढून टाकावे. कर्करोगविरोधी औषधांचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करावा. शिंगे सोलू किंवा घासू नये. विषारी घटक असलेला रंग लावू नये. कडक उन्हात बैलांपासून अधिक वेळ काम करून घेऊ नये. शिंगाला सतत इजा होणाºया गोष्टींना प्रतिबंध करावा. जूवर आवरण घालावे. शिंगांवर सतत मारणे अथवा टोचणे बंद करावे. वेळोवेळी पशुवैद्यकांचे मार्गदर्शन घ्यावे.

शिंगाच्या कर्करोगाचे निदान जिल्ह्यात झाले आहे. शेतकऱ्यांनी याबाबत काही लक्षणे आढळल्यास दिरंगाई न करता पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारार्थ न्यायला हवे.- मोहन गोहत्रे, पशुसंवर्धन उपायुक्त

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचार