गव्हा फरकाडे येथे वळूची दहशत; तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:19 AM2018-08-21T01:19:40+5:302018-08-21T01:20:26+5:30

अंगात लाल सदरा दिसताच मागे धावणे, शिंग मारणे, बैलबंडी उलटवणे, लहान मुलांच्या मागे धावणे, असा नित्यक्रम येथील वळूचा असल्याने संपूर्ण गाव दहशतीत जगत आहे. आतापर्यंत तिघांना जखमी केल्याने याचा लिलाव करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

Bull cruelty in wheat flourishing; Three injured | गव्हा फरकाडे येथे वळूची दहशत; तिघे जखमी

गव्हा फरकाडे येथे वळूची दहशत; तिघे जखमी

Next
ठळक मुद्देग्रामस्थ करणार लिलाव : शेतात, शाळेत जाणे बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : अंगात लाल सदरा दिसताच मागे धावणे, शिंग मारणे, बैलबंडी उलटवणे, लहान मुलांच्या मागे धावणे, असा नित्यक्रम येथील वळूचा असल्याने संपूर्ण गाव दहशतीत जगत आहे. आतापर्यंत तिघांना जखमी केल्याने याचा लिलाव करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
अतुल कुलकर्णी अभिनित वळू चित्रपट खूप गाजलो. यामध्ये गावातील वळूमुळे नागरिक कसे भयभीत होतात, हे दाखवले असून, वळूचे सुंदर चित्रीकरण करण्यात आले आहे. असाच काहीसा प्रकार तालुक्यातील गव्हा फरकाडे येथे रोज घडत आहे. त्याने दोन दिवसांत तीन शेतकऱ्यांना गंभीर जखमी केले. एका वळूमुळे संपूर्ण गाव भयभीत झाला आहे.
तालुक्यातील तीन हजार लोकवस्तीचे हे गाव. येथे तीन वर्षांपूर्वी एक वळू (सांड) कुणीतरी गावात आणून सोडला. तीन वर्षांचा मंदिराजवळ दिवसभर राहणाºया वळूला शेतकरी दररोज चारा टाकायचे. आता याच वळूने गावातच उद्रेक केला आहे.
शेतातून बैलबंडी आली की तो बैलांना मारल्याशिवाय राहत नाही. लाल रंग दिसताच तो चौताळतो. शाळेतील मुलाच्या मागे धावतो. शेतात महिला कामावर जात असल्यास त्यांच्यामागे वळू धावत असल्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहे.

Web Title: Bull cruelty in wheat flourishing; Three injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.