शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

सावित्रीचा वसा जोपासणारी ‘बुधवारा मुलींची शाळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 06:00 IST

नेहरू मैदानातून सन-२००२ मध्ये हे हायस्कूल बुधवारा येथे स्थलांतरित झाले. समाजात मुलींचे शिक्षण दुर्लक्षित, असा समज असताना तत्कालीन मुख्याध्यापक सविता चक्रपाणी, वीणा देशमुख, अरूणा डांगे, भुयार यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. त्यामुळे ही शाळा मुलींच्या पटसंख्येत सतत आघाडीवर आहे. या शाळेच्या सर्व वर्गखोल्या डिजिटल आहे.

ठळक मुद्देडिजिटल वर्गखोल्या : इंग्रजी शिक्षणासाठी अ‍ॅप, ई-लर्निंग प्रणाली, गुणवत्तापूर्ण शिक्षण, दहावीचा निकाल उत्कृष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुली केवळ ‘चूल आणि मूल’ एवढ्यावर सीमित नसून, त्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा वसा जोपासावा. शिकून मोठे व्हावे, विविध क्षेत्रांत ठसा उमटावा, त्याकरिता बुधवारा स्थित महापालिका मराठी मुलींचे हायस्कूल आघाडीवर आहे. या शाळेला ‘एनपीजीईएल’ अंतर्गत २००८ मध्ये आदर्श शाळा पुरस्कार मिळाला आहे.नेहरू मैदानातून सन-२००२ मध्ये हे हायस्कूल बुधवारा येथे स्थलांतरित झाले. समाजात मुलींचे शिक्षण दुर्लक्षित, असा समज असताना तत्कालीन मुख्याध्यापक सविता चक्रपाणी, वीणा देशमुख, अरूणा डांगे, भुयार यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. त्यामुळे ही शाळा मुलींच्या पटसंख्येत सतत आघाडीवर आहे. या शाळेच्या सर्व वर्गखोल्या डिजिटल आहे.शिक्षक आणि लोकसहभागातून टीव्ही, प्रोजेक्टर, साहित्य सदर शाळेला भेट मिळाले आहेत. ई-लर्निंग शिक्षण अनिवार्य आहे. इंग्रजी शिक्षणासाठी ‘रिड टू मी’ अ‍ॅप वापरले जाते. गतवर्षी दहावीत गायत्री राजगुरे ही गुणवत्ता यादीत आली असून, तिने गणितात ९९ गुण प्राप्त केले आहे. माता पालकांसाठी खेळ स्पर्धा, स्नेहसंमेलन, हळदीकुंकू, सांस्कृतिक कार्यक्रम हे वैशिष्ट आहे. विद्या प्राधिकरणातर्फे आयोजित भूमिका पालन स्पर्धेत या शाळेला दोनदा जिल्हास्तरीय प्रथक क्रमांक, तर राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाले आहेत.येथील उत्कृष्ट बँड पथक महापालिका शाळांसाठी नावलौकिक आहे. किशोरी उत्कर्ष मंच अंतर्गत मुलींसाठी विविध उपक्रम राबविले जातात.प्रशासकीय सेवेत ठसामहापालिका मराठी मुलींचे हायस्कूलमधील विद्यार्थिनी केंद्र व राज्य शासनाच्या प्रशासकीय सेवेत आहे. प्राचार्य, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, बँक मॅनेजर, रेल्वे, पोस्ट सेवा अशा विविध क्षेत्रात मुलींनी ठसा उमटविला आहे.शाळेत गुणवत्तापूर्व शिक्षणासोबत विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मुलींचा सहभाग असतो. यात शिष्यवृत्ती परीक्षा, एनएमएमएस, चित्रकला, ग्रामगीता तर, हिंदी परीक्षांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. सामाजिक जाणीवेसाठी जलदिंडी, वृक्षदिंडी, सीड बॉल तर किशोरवयीन मुलींना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन दिले जाते.मुलींचे शिक्षणासह त्यांच्या वैयक्तिक प्रश्नांकडे शिक्षिकांचे लक्ष असते. आरोग्य, रक्त गट तपासणी, समुपदेशकांचे मार्गदर्शन हे शाळेचे वैशिष्ट्य आहे. माजी गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान केला जातो.- रमिया कोठार,अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समितीया शाळेचा दर्जेदार शिक्षणासाठी नावलौकिक आहे. त्यामुळेच पटसंख्या उत्तरोत्तर वाढत आहे. मुलींना स्वंयभू निर्भर बनविण्यासाठी महिला पोलीस, शिक्षिकांचे मार्गदर्शन मिळते. डिजिटल वर्ग, ई-लर्निंग शिक्षण हे वैशिष्टे आहे.- वैशाली कुºहेकर, मुख्याध्यापिका

टॅग्स :Schoolशाळा