वाद कायम : पोलीस करणार महापालिकेमार्फत जागेची मोजणीअमरावती : बीएसएनएलच्या जागेवरील भिंत तोडून अज्ञाताने अतिक्रमण केल्याची तक्रार राजापेठ पोलीस ठाण्यात सोमवारी दाखल झाली. मात्र, ती जागा बीएसएनएलची की राणा शैक्षणिक संस्थेची हा वाद अद्यापही कायम आहे. हा वाद मिटविण्यासाठी आता राजापेठ पोलीस महापालिकेमार्फत जागेची मोजणी करणार आहे. सातुर्णाजवळील क्रॉती कॉलनी मार्गावर बीएसएनएलची मोकळी जागा आहे. त्यांनी त्यांच्याजागेवर ६२ मीटरची संरक्षण भिंत बांधली आहे. त्याचशेजारी राणा शैक्षणिक संस्थेचीही जागा आहे. त्यांनीही तेथे संरक्षण भिंत बांधली आहे. मात्र, सोमवारी बीएसएनलचे उपविभागीय अभीयंता प्रवीण इसोकार यांनी जागेची पाहणी केली असता त्यांना बीएसएनएलच्या जागेवरील भिंत तोडून तेथे सिमेंट क्राँक्रिटचे पिल्लर उभारल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी चौकशी सुरु केल्यावर बीएसएनएल व राणा शैक्षणिक संस्थेची जागा एकमेकांशेजारीच असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नेमकी कोणाची जागा किती याबाबत पोलिसांत संभ्रम निर्माण झाला आहे. या जागेचा वाद मिटविण्यासाठी पोलीस आता महापालिकामार्फत मोजणी करणार आहे. (प्रतिनिधी)
‘ती’ जागा बीएसएनएलची की राणा शैक्षणिक संस्थेची?
By admin | Updated: July 29, 2015 00:14 IST