थोडक्यातील बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:14 IST2021-04-07T04:14:01+5:302021-04-07T04:14:01+5:30

अमरावती : ग्रामीण भागात सध्या गहू काढणीच्या कामाला वेग आला आहे. गत काही दिवसांपासून गहू कापणीसोबतच काढणीच्या कामात शेतकरी ...

Brief news | थोडक्यातील बातम्या

थोडक्यातील बातम्या

अमरावती : ग्रामीण भागात सध्या गहू काढणीच्या कामाला वेग आला आहे. गत काही दिवसांपासून गहू कापणीसोबतच काढणीच्या कामात शेतकरी वर्ग गर्क आहे.

.....................................................

हिरापूर ते निमखेड रस्ता उखडला

अंजनगाव सुर्जी; तालुक्यातील हिरापूर ते निमखेड बाजार गावाकडे जाणारा डांबरी रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. परिणामी नागरिकांना तसेच वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

..............................................................

अखेर ‘त्या’ रस्त्याचे डांबरीकरण

अमरावती : स्थानिक भातकुली पंचायत समितीमधील डांबरी रस्ता गत काही दिवसांपासून उखडला होता. यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. ही गैरसोय लक्षात घेता, अखेर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले.

.....................................

घरकुलासाठी विटांची मागणी वाढली

अमरावती : प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत सध्या ग्रामीण भागात घरकुलाची कामे सुरू आहेत. त्यामुळे विटा, रेती, सिमेंट, लोखंड आदी साहित्याची मागणी वाढली आहे. मात्र, वाळू आणि विटा वेळेवर उपब्ध होत नसल्याने लाभार्थींची कसरत होत आहे.

...............................................

ॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅ

Web Title: Brief news