The bridle-toothbrush was carried away for the third time | सावळी-दातुराचा पूल तिसऱ्यांदा गेला वाहून
सावळी-दातुराचा पूल तिसऱ्यांदा गेला वाहून

ठळक मुद्देपरतवाडा-अकोला महामार्ग ठप्पच : विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, जीवितहानीची जबाबदारी घेणार कोण?

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : एक-दोनदा नव्हे तिसऱ्यांदा परतवाडा-अकोला मार्गावरील पर्यायी पूल वाहून गेला. अकोला महामार्गावरील सावळी-दातुरा येथे हा प्रकार घडला. मंगळवारी दिवसभर हा पूल तयार करण्यात आला होता. नदीचा पूल वाहून गेल्यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. कन्स्ट्रक्शन कंपनीच्या बेपर्वाईमुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे. जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
परतवाडा-अकोला महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम एमएसकेएल कन्स्ट्रक्शन कंपनीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे देण्यात आले आहे. संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कामावर आता प्रश्न निर्माण झाले आहे. मागील पंधरा दिवसांपासून अकोला-परतवाडा हा महामार्ग सावळी-दातुरा गावानजीक तिसºयांदा तयार करण्यात आलेला पूल वाहून गेल्यामुळे ठप्प पडला आहे. सपन नदीवर असलेला जुना पूल पूर्णत: जमीनदोस्त करण्यात आला. त्या ठिकाणी उंच पूल तयार होणार आहे. मात्र, पावसाळ्याचे दिवस पाहता सिमेंट पाइप टाकून मातीने झाकण्यात आले. नदीसह सपन प्रकल्पातून सोडलेल्या पाण्यात तिसºयांदा हा पूल वाहून गेला. या घटनेला संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनी व विभाग जबाबदार असल्याचा आरोप पर्यावरण संघटनेचे योगेश खानजोडे यांनी केला आहे.
महामार्ग अभियंता व कंपनीवर प्रश्नचिन्ह?
पावसाळ्याच्या दिवसांत नदीच्या प्रवाहाचा कुठलाच अंदाज संबंधित राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंत्यांना येऊ नये, यावरच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एमएसकेएल कंट्रक्शन कंपनीने बेजबाबदारपणाचा कळस गाठला असताना, संबंधित अभियंत्यांचे संगनमत नागरिकांच्या जिवावर बेतणारे ठरले आहे. यावर वरिष्ठ अधिकारी व पांढरपेशे गप्प बसून आहेत, तर जीवघेणा प्रवास सुरू असतानाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित कंत्राटदार कुंभकर्णी झोपेत आहेत.
दैनंदिन कामात व्यत्यय
परतवाडा-अकोला महामार्गावर सावळी, वडगाव फत्तेपूर, पथ्रोट परिसरातील १५ ते २० गावे आहेत. तालुका मुख्यालयी येणाºया नागरिकांसह मोठी बाजारपेठ असल्याने चिल्लर व्यापारी, विद्यार्थी रुग्ण यांच्यासाठी हा मार्ग सोयीचा होता. आता दहा ते पंधरा किलोमीटर फेºयाने ये-जा करावी लागत आहे. गंभीर रुग्णांना वाटेतच मरण देणारा पूल ठरला आहे.
विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
दोन भागात वसलेल्या सावळी-दातुरा गावाच्या मधून सपन नदीचा पूल आहे. वॉर्ड १ मध्ये जिल्हा परिषदेची शाळा आहे. बुधवारी सकाळी पल्लवी कस्तुरे, रीतू बारस्कर,पायल, प्रजापती, तुलसी कस्तुरे दुर्गेश धुर्वे तसेच वॉर्ड क्रमांक ३ मधील जवळपास दहा विद्यार्थ्यांना तेथून जाणारे मोहन पाटणकर, प्यारेलाल प्रजापती, आकाश बोरेकार, मोहम्मद आसिफ, अमोल बोरेकार यांनी कडेवर घेत पलीकडे सुखरूप पोहचविले.


Web Title: The bridle-toothbrush was carried away for the third time
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.