शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धासारखा प्रकार होता होता राहिला; ‘लिव्ह इन’रिलेशनशिपला ब्रेक लागला; प्रेयसीच्या घरासमोर मनगटावर मारले ब्लेड!

By प्रदीप भाकरे | Updated: November 16, 2022 18:35 IST

खोलापुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील घटना: पाठलाग करून विनयभंगही

अमरावती : प्रियकरासोबत ‘लिव्ह इन’ मध्ये राहत असताना वाईट अनुभव पदरी पडल्याने निराश झालेल्या प्रेयसीने आईचे घर गाठले. मात्र, प्रियकराने पुन्हा ‘लिव्ह इन’मध्ये राहण्याचा तगादा लावला. त्यामुळे प्रियकराने तिच्या आईचे घर गाठून तेथे स्वत:च्या हाताच्या मनगटावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही रक्तबंबाळ घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अमन रामराव रौराळे (२६, समाधाननगर, अमरावती) याच्याविरूध्द आत्महत्येचा प्रयत्न करणे, विनयभंग, शिविगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, फिर्यादी तरूणी व आरोपीचे प्रेमसंबंध असल्याने ते मार्च २०२२ पासून पुढे तीन महिने ‘लिव्ह इन’ मध्ये राहिले. आरोपीच्या आई वडिलांसोबत ती राहिली. त्या काळात आरोपीकडून तिला शारीरिक व मानसिक त्रास झाला. त्यामुळे तिने आरोपीसोबत ‘लिव्ह इन’ रिलेशनशिपमध्ये न राहण्याचे ठरविले. आरोपीच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी तरूणी बहिणीच्या घरी परतली. तेथून २ नोव्हेंबर रोजी ती आईकडे राहण्याकरीता आली. त्यावेळी देखील तो तिच्या आईचे घरी येऊन धडकला. तिला ‘लिव्हईन रिलेशन’मध्ये राहण्याबाबत धमकावित होता. तिच्या मोबाईलवर वारंवार कॉल करुन तिचा पाठलाग देखील केला. तिला भेटण्यासाठी देखील त्याने तगादा लावला. त्याला नकार दिला असता त्याने आपल्याला शिविगाळ करुन मारण्याच्या धमक्या दिल्याचे तरूणीने तक्रारीत म्हटले आहे.

अशी घडली घटना

तू जर मला भेटली नाही तर मी माझ्या जीवाचे बरेवाईट करतो, अशी धमकी तिला देण्यात आली. दरम्यान, तरूणी ही घरी असताना आरोपी अमनने तिच्या आईच्या मोबाईलवर कॉल केला. मी तुझ्या घरी येतो व माझे जीवाचे बरे वाईट करतो. अशी धमकी दिली. थोड्या वेळाने आरोपी तिच्या घरासमोर आला. तिला आवाज दिला. मात्र तिने आरोपीच्या गोष्टीला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आरोपीने स्वत: त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावर ब्लेडने चिरे मारले. आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिने मंगळवारी सायंकाळी खोलापुरी गेट पोलीस ठाणे गाठले. तेथील एएसआय विजय पांडे यांनी तिची तक्रार दाखल करून घेतली. तथा आरोपी अमनला तातडीने अटक केली. नंतर त्याची जामीनावर मुक्तता करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती