शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

...अन् 'त्याने' प्रेयसीवर चढविला चाकूने हल्ला, देवरणकरनगरमधील खळबळजनक घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2022 14:07 IST

सहकारीही गंभीर जखमी

अमरावती : खासगी बँकेत नोकरी करणाऱ्या एका तरुणीसह तिच्या कार्यालयीन सहकाऱ्याला एका तरुणाने चाकूने भोसकले. यात ती तरुणी व तिचा सहकारी तरुण गंभीर जखमी झाला. प्रेयसी तिच्या काही मित्रांसह रात्री एक वाजता पार्टीतून आली तसेच ती कॉल रिसिव्ह करीत नसल्याने संतप्त झालेल्या प्रियकराने ते कृत्य केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

ही घटना देवरणकरनगरमध्ये २८ ऑक्टोबर रोजी उशिरा रात्री १२.४० च्या सुमारास घडली. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी आरोपी राहुल (रा. अर्जुननगर, अमरावती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. जखमी तरुणी शहरातच एका खासगी बँकेत नोकरी करते. ‘मंथ एन्ड’ पार्टी करण्यासाठी ती ऑफिसमधील मित्र मैत्रिणींसोबत शुक्रवारी रात्री एका हॉटेलमध्ये गेली होती. दुसरीकडे शुक्रवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास राहुल तिला भेटण्यासाठी गेला होता.

ती साईनगर भागात भाड्याने खोली करून राहते. त्याने तरुणीला वारंवार कॉल केले, मात्र तिने कॉल रिसिव्ह केले नाहीत. मैत्रिण कम प्रेयसी पार्टीसाठी गेली आहे. त्यामुळे ज्या मित्रांसोबत गेली, त्यापैकी एक देवरणकरनगर भागातील असल्याचे त्याला माहिती झाले. त्यामुळे तो देवरणकरनगर भागात येऊन तरुणीची प्रतीक्षा करीत थांबला होता. रात्री पाऊण ते एक वाजेच्या सुमारास तरुणी तिच्या ऑफिसच्या सहकाऱ्यांसोबत त्या ठिकाणी पोहोचली.

यावेळी तू कॉल रिसिव्ह का करत नाही, कारमधील हे सर्व कोण आहेत, अशी शंका उपस्थित करून त्याने वाद घातला. याचवेळी तरुणीचा एक ऑफिस सहकारी जो पार्टीसाठी तिच्यासोबत होता, तो कारमधून खाली उतरला. राहुलने त्याच्या पोटात चाकूने घाव घातला. याचवेळी तरुणी मधात आली तर तिच्याही मांडीत त्याने चाकू मारला. ही माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तू प्रेमात धोका दिला, तुला जिवानेच मारतो, असे म्हणून आरोपी राहुलने त्याची कथित प्रेयसी व पुरुष सहकाऱ्याला जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पोलिसात नोंदविण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती