निवेदन : मागण्या निकाली काढण्याची मागणीअमरावती : शासन व प्रशासन स्तरावर मागील अनेक वर्षापासून तलाठयाच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे दहावी कृ षी गणना सन २०१५-१६ च्या कामावर बहिष्कार असल्याचा इशारा बुधवारी विदर्भ पटवारी संघ जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदनाव्दारे तलाठयांनी दिला आहे.तलाठयाच्या प्रमुख मागण्यांमध्ये मग्रारोहयो अंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहिरींच्या अर्ज नमुन्यामध्ये आवश्यक कागदपत्रांमध्ये तलाठी दाखल्याचा समावेश करण्यात आला आहे. ५०० फुटाच्या विहिरी आहे किंवा नाही, एक हजार फुटाच्या आत ईलेक्ट्रीक पोल असल्याचा दाखला देण्याकरिता आदेशीत केले आहे.ईलेक्ट्रीक पोलबाबत महावितरण कंपनीकडून माहिती मागविण्यात यावी, सोबतच आवश्यक माहीती पुरविण्यासाठी स्वतंत्र्य यंत्रणा उभारावी. संबंधित यंत्रणेमार्फत हे काम करावे यासह आदी मागण्या पूर्ण झाल्या नाही तर दहाव्या कृषी गणनेच्या कामावर तलाठी बहिष्कार राहील, असा इशारा विदर्भ पटवारी संघाचे जिल्हाध्यक्ष मनोज राऊत, स्वप्नील भुयार, नरेंद्र धोटे, मनोज धर्माळे आदिंनी दिला आहे.
दहाव्या कृषी गणनेसाठी तलाठ्यांचा बहिष्कार
By admin | Updated: May 4, 2017 00:11 IST