शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बचा थरार बंकरमध्ये राहणे, ‘रेडी टू इट’ जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2022 05:01 IST

युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी जिल्ह्यातून दहा विद्यार्थी गेले आहेत. त्यापैकी काहींशी ‘लोकमत’ने संपर्क साधला.  वस्तुस्थिती जाणून घेतली.  रशिया-युक्रेन या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये कोणी जिल्ह्यातील नागरिक अडकले असतील तर त्यांच्या नातेवाइकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तसेच केंद्र शासनाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी गुरुवारी केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : थोड्या थोड्या वेळाने बॉम्बचा आवाज येतो. हॉस्टेलच्या खाली बंकर तयार करण्यात येऊन आम्हाला ठेवण्यात आले आहे. कुणाशीही फारसा संपर्क नाही, अधूनमधून मिल्ट्रीचे सैनिक येतात. काऊंटिंग करतात, आम्ही प्रचंड दहशतीत वावरत आहोत. आमच्या परतीसाठी प्रयत्न करा, अशी आर्जव मिळेल त्याला करतोय, ही आपबिती आहे युक्रेनमध्ये अडकलेल्या अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची... विशेष म्हणजे, युक्रेनमध्ये युद्धच सुरू झाल्याने रशिया सीमेवर आठ दिवसांपासून धुमश्चक्री सुरू आहे. फारसा गंभीर प्रकार नाही, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात आता आम्ही जीव मुठीत घेऊन आहोत, असेही ते सांगतात.युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी जिल्ह्यातून दहा विद्यार्थी गेले आहेत. त्यापैकी काहींशी ‘लोकमत’ने संपर्क साधला.  वस्तुस्थिती जाणून घेतली.  रशिया-युक्रेन या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये कोणी जिल्ह्यातील नागरिक अडकले असतील तर त्यांच्या नातेवाइकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तसेच केंद्र शासनाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी गुरुवारी केले आहे.त्यानंतर दहा विद्यार्थ्यांच्या नातेवाइकांनी युक्रेनमधील आप्तांच्या रहिवासी पत्त्यासह फोन नंबरची माहिती आपत्ती निवारण कक्षाला दिली व या कक्षाने मंत्रालयातील राज्य आपत्ती निवारण कक्षाला व तेथून दूतावासाला देण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तालुक्यातील महसूल व पोलीस यंत्रणेद्वारा युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची माहिती घेण्यात आल्याचे बिजवल म्हणाले. जिल्हा नियंत्रण कक्षात शुक्रवारी दिवसभरात आठ व सायंकाळनंतर दोन विद्यार्थ्यांची माहिती प्राप्त झाली व यासंदर्भात राज्य नियंत्रण कक्षाला कळविण्यात आले.

हे आहेत ते विद्यार्थीअभिषेक बारब्दे, प्रणव फुसे, साहीर तेलंग, तुषार गंधे, तनिष्क सावंत, वृषभ गजभिये, स्वारज पुंड, प्रणव भारसाकळे, कुणाल कावरे व नेहा लांडगे या विद्यार्थ्यांची नावे बारतील दूतावासाला सध्या कळविण्यात आलेली आहेत. यामध्ये काही नावे वाढण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने सांगितले. युक्रेनमध्ये धूमश्चक्री असली तरी रशियात सध्या विद्यार्थी सुरक्षित आहेत.

सैनिकांद्वारे बंकरमध्ये चौकशीहॉस्टेलच्या खाली तात्पुरते बंकर तयार करण्यात आले आहे. येथे अधूनमधून युक्रेनची मिलिटरी येते. किती जण आहेत, याची माहिती घेते. फोटो काढण्यास मनाई करण्यात आलेली आहे. अशा युद्धस्थितीत आम्ही या देशाची सीमा कशी ओलांडणार, असा प्रश्न विद्यार्थांना भेडसावत आहे. 

बाॅर्डर क्राॅस करून पोलंड, रुमालियास जाण्याच्या सूचना युक्रेनची राजधानी किवीपासून २०० किमी अंतरावरील व्हिनितसिया या शहरात राहणाऱ्या स्वराज पुंड या विद्यार्थ्याने सांगितले, बंकरमध्ये आमची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, त्यातून सध्या बाहेर निघता येत नाही. भारतीय विद्यार्थ्यांसह अन्य देशातील नागरिकांना युक्रेनच्या सीमेपलीकडे असलेल्या पोलंड या देशात सीमा ओलांडून जाण्याच्या सूचना दूतावासाद्वारा देण्यात आलेल्या असल्याचेही स्वराज सांगतो.  

 

टॅग्स :Studentविद्यार्थीwarयुद्ध