शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मंडळ कायम

By admin | Updated: December 29, 2015 02:16 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पुढील आदेशापर्यंत मावळते संचालक मंडळच कायम राहिल, असा महत्त्वपूर्ण आदेश

अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पुढील आदेशापर्यंत मावळते संचालक मंडळच कायम राहिल, असा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी काढला. त्यामुळे कार्यकाळ संपुष्टात येऊनही बबलू देशमुख यांच्या नेतृत्वातील २५ सदस्यीय संचालक मंडळच पुढील आदेशापर्यंत बँकेचे कामकाज करणार आहे.विशेष म्हणजे अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची मुदत रविवारी (२७ डिसेंबर) संपुष्टात आल्यानंतर विभागीय सहनिबंधक संगीता डोंगरे यांनी प्राधिकृत अधिकारी नेमून आजच बँकेचा पदभार स्वीकारला. त्या पार्श्वभूमिवर आजच न्यायालयीन निर्णय आल्याने बँक व्यवस्थापन पुन्हा पेचात अडकले आहे. न्यायालयीन निर्णयाबाबत आपण ऐकले असून आॅर्डर मिळालेली नाही. आॅर्डरची प्रत मिळाल्यानंतर न्यायालयात बाजू मांडू, असे विभागीय सहनिबंधक संगीता डोंगरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम १६६/४ या तरतुदीनुसार निवडणूक होईपर्यंत जुनेच संचालक मंडळ कायम ठेवण्यात यावे, अशी विनंती याचिका बँकेचे विद्यमान संचालक प्रवीण काशीकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाकडे आठवड्यापूर्वी दाखल केली होती. त्यावर सोमवारी न्या. झेड. ए. हक यांच्या अवकाशकालीन न्यायालयाने ती विनंती मान्य करीत पुढील आदेशापर्यंत ‘प्रेझेंट बोर्ड आॅफ डायरेक्टर शाल कंटिन्यू अनटील फर्दर आॅर्डर’ असा निर्णय सुनावला आहे. याशिवाय प्रशासन बँकेची निवडणूक घेण्यासाठी पावले उचलू शकते. तथापि सहकार प्रशासनाला प्रशासक किंवा प्रशासकीय मंडळ नेमणुकीसाठी कुठलेही पाऊल उचलता येणार नाही, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ रविवारी संपुष्टात आला. त्या पार्श्वभूमिवर आज प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार आम्ही सकाळीच चार्ज घेतला. न्यायालयीन निर्णयाची प्रत अद्याप अप्राप्त आहे.- संगीता र. डोंगरेप्राधिकृत अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक.जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यावर विभागीय सहनिबंधकांनी कुठलीही नोटीस न देता एकांगी पदभार घेतला, हे गैर आहे. तथापि न्यायालयीन निर्णयाने विद्यमान संचालक मंडळच कायम आहे.- नितीन हिवसेसंचालक, अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँक.