शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात शालेय विद्यार्थ्यांवर ‘ब्ल्यू व्हेल’चे सावट! शाळा स्तरावर सल्लागार समिती : शिक्षण संचालकांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 18:12 IST

‘ब्ल्यू व्हेल’ या मोबाइल गेमपासून शालेय विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी सर्व शाळांमध्ये सल्लागार समिती कार्यान्वित केली जाणार आहे. राज्याचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाने यांनी १५ जानेवारीला हे आदेश पारित केलेत.

- प्रदीप भाकरेअमरावती - ‘ब्ल्यू व्हेल’ या मोबाइल गेमपासून शालेय विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी सर्व शाळांमध्ये सल्लागार समिती कार्यान्वित केली जाणार आहे. राज्याचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाने यांनी १५ जानेवारीला हे आदेश पारित केलेत. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी व मुंबईच्या शिक्षण निरीक्षकांनी त्यांच्या अखत्यारीतील सर्व शाळा व विद्यालयांना याबाबत सूचना द्याव्यात आणि सल्लागार समिती गठित करून त्याचा अहवाल शिक्षण आयुक्तांना पाठविण्याचे निर्देश म्हमाने यांनी दिले आहेत.         रशियात शेकडो मुलांच्या आत्महत्येसाठी कारणीभूत ठरलेल्या ब्ल्यू व्हेल गेमने आॅगस्ट २०१७ मध्ये भारतात शिरकाव केला होता. या गेमच्या नादापायी अंधेरीतील १४ वर्षीय मुलाने इमारतीवरून उडी घेतली होती. त्यात त्याला प्राण गमवावे लागले. यातून या व्हिडीओ गेमची काळीकुट्ट बाजू समाजासमक्ष आली. त्या पार्श्वभूमीवर ब्ल्यू व्हेल या गेमपासून मुलांना लांब ठेवण्यासाठी शाळास्तरावर सल्लागार समिती स्थापन करावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे वसई विरार शहरप्रमुख गोविंदा गुंजाळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्याची दखल घेत शालेय शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी मिलिंद सराफ यांनी शिक्षण संचालक व शिक्षण आयुक्तांना निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने या सल्लागार समित्या राज्यभरातील शाळांमध्ये गठित करण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे ‘ब्ल्यू व्हेल’?आॅनलाइन खेळल्या जाणा-या या गेममध्ये एक मास्टर मिळतो. मास्टर प्लेअरला कठीण टास्क देतो. स्वत:च्या रक्ताने ब्ल्यू व्हेल तयार करणे, शरीरावर जखमा करणे, दिवसभर हॉरर फिल्म पाहणे, रात्रभर जागणे या प्रकारचे टास्क दिले जातात. त्यात गुंतत जाणा-यांसाठी शेवटचा टास्क आत्महत्येला प्रवृत्त करणारा असतो. यातून अनेक मुलांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले होते. जगातल्या अनेक देशात ब्ल्यू व्हेल गेमचा  जीवघेणा हैदोस असताना भारतात त्यावर बंदी घालण्यात आली होती.

टॅग्स :Blue Whaleब्लू व्हेलAmravatiअमरावती