शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

लोकमतच्यावतीने जिल्ह्यात आजपासून रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 05:00 IST

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांची २ जुलै रोजी जयंती आहे. त्याप्रीत्यर्थ अमरावतीसह जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांच्या ठिकाणी नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं हा रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविण्यात येत आहे. २ व ३ जुलै रोजी लोकमत वृत्तपत्र कार्यालय, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचा शुभारंभ आहे.

ठळक मुद्देनातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याच, महाशिबिराची अमरावतीहून सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रक्तदान म्हणजे जीवनदान. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून निर्बंध लागल्याने राज्यभरात रक्तदानाचे उपक्रम थांबले होते. पर्यायाने शस्त्रक्रियांसह अनेक उपचारांमध्ये अडचणी निर्माण झाल्या. रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर लोकमत'च्यावतीने जिल्ह्यात २ ते ११ जुलै या कालावधीत सकाळी १० ते ३ या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जिल्हाभरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांची २ जुलै रोजी जयंती आहे. त्याप्रीत्यर्थ अमरावतीसह जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांच्या ठिकाणी नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं हा रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविण्यात येत आहे. २ व ३ जुलै रोजी लोकमत वृत्तपत्र कार्यालय, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचा शुभारंभ आहे.अमरावती परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. श्यामसुंदर निकम, अमरावती शहर उपविभाग क्र.१ चे अतिरक्त कार्यकारी अभियंता (महावितरण) प्रदीप अंधारे हे शिबिराचे उद्‌घाटन करतील. कोविड संकटाच्या काळात रक्त तुटवड्यामुळे ज्यांना नियमित रक्ताची गरज भासते असे थॅलेसीमिया, सिकलसेल रुग्णांचीही गैरसोय होत आहे. गर्भवती मातांसह अपघातग्रस्तांना आपतकालीन परिस्थितीत रक्ताची गरज भासते. या स्थितीत वेळेत रक्तदाता शोधणे व त्याचा रक्तगट जुळवणे हे अतिशय जिकरीचे काम आहे. या सर्वांना जीवनदान देण्यासाठी खऱ्या दात्यांनी पुढे येण्याची गरज आहे, तरच आपण खऱ्या अर्थाने जीवनदान अर्पण करू शकतो. शासकीय रक्तपेढीत आज रक्ताचा ठणठणाट आहे. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करतानाही अडचणी येत आहे.कोरोना महामारी व लसीकरणामुळे अनेकांना रक्तदानाची इच्छा असूनही मर्यादा आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर 'लोकमत'ने सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घेतला आहे. यात सक्रिय सहभाग नोंदवून ही लोकचळवळ उभी राहावी, असे आवाहनही करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ९२७०१३१५८०

यांनी करावे रक्तदान - १८ ते ६० वर्ष वयोगटातील व्यक्ती.- कोविड निगेटिव्ह झाल्यानंतर २८ दिवसाने रक्तदान करता येते.- लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसाने रक्तदान करता येते.- दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसाने रक्तदान करता येते. 

 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट