शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील अंधश्रद्धा : फूल गिर गया, अब गाव मे शेर आयेगा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 10:49 IST

मेळघाटातील अंधश्रद्धा : जखमेवर अळी पडल्याने चूल बंद, गाव दिवसभर उपाशी

श्यामकांत पाण्डेय

धारणी (अमरावती) : मेळघाटातील गावखेड्यात एखाद्या व्यक्तीला झालेल्या जखमेवर अळी पडल्यास, त्याला ‘फूल गिर गया, अब गाव में शेर आयेगा’ अशी अंधश्रद्धा आजही जोपासली जात आहे. त्याचा प्रत्यय मंगळवारी चाकर्दा येथे आला. धारणी तालुक्यातील चाकर्दा येथे गावातील एका वृद्धाच्या पायाला दुचाकीच्या सायलेन्सरचा चटका लागला होता. त्याला मधुमेह असल्याने त्याची जखम भरून निघत नव्हती.

दरम्यानच्या काळात त्याच्या जखमेवर अळी पडली. ‘फूल गीर गया...’ ही वार्ता गावात पसरताच ग्रामस्थांनी स्वयंपाक करणे बंद केले. परिणामी संपूर्ण गाव मंगळवारी सकाळपासून उपाशी होता. या सर्व प्रकारावर उपाय म्हणून गावातील परिहार (पुजारी) त्या व्यक्तीला गावाबाहेरील सिपना नदीच्या काठावर घेऊन गेला. तेथे त्याच्यावर परंपरेनुसार पूजा व उपचार करण्यात आले. त्या व्यक्तीच्या जखमेवर उपचार करून अळ्या बाहेर काढण्यात आल्या व नदीच्या काठावर कोपऱ्यामध्ये खड्डा खणून त्यामध्ये त्या व्यक्तीला बसवण्यात आले. परिहार त्याच्यावर मंत्रोच्चार करून उपचार करीत होता. अखेर त्या व्यक्तीला बसविण्यात आलेल्या जागी अग्नी प्रज्वलित करण्यात आला. ‘भागो रे भागो, तेरा घर जल रहा’ असे बोलताच ती व्यक्ती बाहेर पडली आणि पाहता पाहता त्याच्यावर उपचार झाल्याची घोषणा त्यांनी केली. त्यानंतरच गावामध्ये स्वयंपाक करण्यात आला.गावकऱ्यांचा अजब तर्कया घटनेबाबत लोकमतच्या प्रतिनिधीने गावातील वयोवृद्धांना विचारणा केली असता, अशा प्रकारचे जखमेवरची अळी झालेल्या व्यक्तींचा गाव परिहारद्वारे उपचार न केल्यास गावात वाघ येतो व गावाला त्रास देतो, अशी आख्यायिका असल्याचे समोर आले.

टॅग्स :TigerवाघMelghatमेळघाट