शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ज्याची बादली पाण्याने भरली, तो नशीबवान; मेळघाटातील वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 05:00 IST

चिखलदरा तालुक्यातील खडीमलसह २० गावांमध्ये पाणीटंचाईचा सामना आदिवासी करीत आहेत. उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मेळघाटात २५ वर्षांपासून हीच अवस्था आहे. पाणीपातळी खालावल्याने लाखो रुपयांच्या योजना मृत पडल्या. टँकरशिवाय कुठलाच पर्याय नाही. नादुरुस्त वजा बेपत्ता रस्त्यांवरून पाणी पोहचवले जात आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच अनेक गावांच्या घशाला कोरड पडली.

नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : त्यांची सकाळ पाण्याने नव्हे, तर पाण्याच्या प्रतीक्षेत जाते. चातकाप्रमाणे ते टँकरची वाट पाहतात. टँकर ओतला गेला की, संपूर्ण गाव धावत सुटते विहिरीकडे. दोरखंडाने बांधलेल्या शेकडो बादल्या एकाच वेळी विहिरीत पडतात. मात्र, ज्याची बादली पाण्याने भरली, तो नशीबवान. हे चित्र आहे मेळघाटातील खडीमल गावाचे. चिखलदरा तालुक्यातील खडीमलसह २० गावांमध्ये पाणीटंचाईचा सामना आदिवासी करीत आहेत. उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मेळघाटात २५ वर्षांपासून हीच अवस्था आहे. पाणीपातळी खालावल्याने लाखो रुपयांच्या योजना मृत पडल्या. टँकरशिवाय कुठलाच पर्याय नाही. नादुरुस्त वजा बेपत्ता रस्त्यांवरून पाणी पोहचवले जात आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच अनेक गावांच्या घशाला कोरड पडली.पाणी अन्य तालुक्यांनामेळघाटात पायथ्याशी असलेल्या शहानूर धरणातून अंजनगाव, दर्यापूर तालुक्यांना, चंद्रभागा धरणावरून अचलपूर, परतवाडा शहर, तर सापन प्रकल्पातून चांदूर बाजार व अचलपूर तालुक्यातील ८५ गावांना पाणीपुरवठा होतो. मात्र, पाणी देणाऱ्या तालुक्यातील आदिवासींची भटकंती होत आहे.

खडीमलची अवस्था सर्वांत भीषणखडीमल या आठशे लोकवस्तीच्या पाड्याला तीन किलोमीटर अंतरावरील नवलगाव येथील विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो. वीज नसल्याने सौरऊर्जा पंपावर दोन टँकर भरला जाईल एवढेच पाणी निघते. हे पाणी विहिरीत टाकल्यावर आदिवासी बादलीने ओढून नेतात. रस्ताच अत्यंत खराब असल्याने प्रशासनाला दुसरा टँकर लावता आला नाही. नजीकच्या नदी-नाल्यात झिरे खोदून पाण्याचा शोध घेण्याचा व्यर्थ प्रयत्न करतात.

हातपंप निकामेआदिवासी पाड्यांमध्ये दीडशेवर हातपंप पाणी खोलवर केल्याने कोरडे पडले आहे. चारशेच्या जवळपास हातपंप परिसरात आहेत. उन्हाळ्यात दरवर्षी ही स्थिती असते. 

२० गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. खडीमल येथे अतिरिक्त टँकरने पुरवठा होणार आहे. वीजपुरवठा नसल्याने टँकर भरला जात नाही. रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यावर उपाय काढले जात आहे.- जयंत बाबरे, गटविकास अधिकारी, चिखलदरा

२० गावांमध्ये टँकरचिखलदरा तालुक्यातील आवागड, खंडुखेडा, खोंगडा, एकझिरा, गौलखेडा बाजार, धरमडोह, बहादरपूर, आकी, नागापूर, सोमवारखेडा, मोथा, आलाडोह, लवादा, बगदरी, तोरणवाडी, तारूबांदा, रायपूर, खडीमल आदी २० गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात