‘स्मार्ट सिटी’चा झगमगाट : इंद्रपुरीच्या एका शांत रात्रीचे हे विलोभनीय रूप. अमरावती शहराचा ‘स्मार्ट सिटी’च्या यादीत समावेश झालाय. लवकरच त्यादृष्टीने अंबानगरी कात टाकणार आहे. ‘स्मार्ट’ शहरात गणना होण्याकरिता आवश्यक ते सर्वच निकष अंबानगरीत आहेत. पंचवटीकडून इर्वीनकडे जाणारा लखलखीत रस्ता, त्यावर हायमास्ट लाईट्सचा झगमगाट, बाजूलाच विस्तीर्ण असा उड्डाण पूल आणि रस्त्याच्या कडेला असलेले दिशादर्शक फलक पाहून अंबानगरीला ‘स्मार्ट’ होण्यात कोणतीच अडचण येणार नाही, असे दिसते.
‘स्मार्ट सिटी’चा झगमगाट :
By admin | Updated: November 5, 2015 00:22 IST