शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

भाजपचा आधारवड हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 01:37 IST

माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधना२मुळे भाजपचा आधारवड हिरावला असून, त्यांची तेज:पुंज प्रतिमा कार्यकर्त्यांच्या मनात ठसठशीत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी केले.

ठळक मुद्देपालकमंत्री : अटलबिहारी वाजपेयींच्या अस्थिकलशाचे शहरात आगमन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधना२मुळे भाजपचा आधारवड हिरावला असून, त्यांची तेज:पुंज प्रतिमा कार्यकर्त्यांच्या मनात ठसठशीत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी केले.माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश अमरावतीत गुरुवारी सकाळी बडनेरा येथे अस्थिकलश शालिमार एक्सप्रेसने आणलेला अस्थिकलश सर्वप्रथम अमरावती शहर भाजप मुख्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आला. येथे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, आ. अनिल बोंडे, आ. सुनील देशमुख, माजी आमदार अरुण अडसड, जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, प्रदेश सचिव निवेदिता चौधरी, शहराध्यक्ष जयंत डेहणकर, शहर सचिव तुषार भारतीय, महापौर संजय नरवणे, सुरेखा लुंगारे, किरण पातूरकर, विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे, डॉ.राजीव जामठे, नगरसेवक अनिल आसलकर यांच्यासह सर्व नगरसेवक आदींनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले. यानंतर अस्थिकलश गुरुकुंज मोझरीकडे रवाना झाला. दरम्यान, अंबा मंडळातर्फे स्थानिक सराफातील महाराणा प्रताप पुतळ्याजवळ शुक्रवारी दुपारी ४ अस्थिकलश ठेवण्यात येईल. सायंकाळी ६.३० वाजता संत ज्ञानेश्वर सभागृहात सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा होईल. २५ आॅगस्ट रोजी दुपारी ४. ३० ते ५.१५ दरम्यान मोर्शी व सायंकाळी ६.३० वाजता वरूड येथे अस्थिकलश आणला जाईल.तिवसा/मोझरी : देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश गुरुवारी दुपारी तिवसा तालुक्यात आला होता. यावेळी अस्थिकलशाच्या दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली. गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीसमोर अस्थिकलश ठेवण्यात आला होता. त्यांनतर तिवसा पेट्रोल पंप चौकात अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला. भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. पालकमंत्री प्रवीण पोटे, अरुण अडसड, निवेदिता चौधरी, दिनेश सूर्यवंशी, तुषार भारतीय, जनार्दनपंत बोथे, राजाराम बोथे, रविराज देशमुख, संजय चांडक, अमित बाभूळकर, अजय आमले, गुलाब खवसे, अरविंद राठोड, अमोल बांबलसह शेकडो कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBJPभाजपा