निवेदन : पशु दवाखाना २४ तास सुरू ठेवण्याची मागणीअमरावती : पशुवैद्यकीय दवाखाना २४ तास सुरू ठेवण्यात यावा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना बुधवारी निवेदनाव्दारे केली आहे.तहसील कार्यालय परिसरात पशुसंवर्धन विभागाचा दवाखाना आहे. मात्र हा दवाखाना केवळ कार्यालयीन वेळेतच उघडा राहतो. दरम्यानच्या काळात दोन गार्इंचा आजाराने मूत्यू झाला. पशु व प्राण्यांना २४ तास सेवा मिळावी या हेतूने शासकीय पशुदवाखाना सुरू ठेवण्याची मागणी भाजपा जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे निवेदनावदारे केली. यावेळी श्याम हिंगासपुरे, सतीश करेसिया, सचिन कारले, योगेश वानखडे, जाकीर जमाल, विशाल वानखडे, ऋषिकेश देशमुख, अक्षय बांबोळकर, सारंग पागरूत, यश जळीत, खुशांत मुलानी, रूशब गुल्हाने, दर्शन जाधव, कुणाल सोनी, अक्षय वानखडे, आकाश पाटील, आदर्श भुयार, प्रफुल्ल भडके आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भाजपा युवा मोर्चाची जिल्हा कचेरीवर धडक
By admin | Updated: September 26, 2015 00:01 IST