शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सोडण्याची पोस्ट व्हायरल - प्रवीण पोटेंची पोलिसांत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलहाला कंटाळून प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण पोटे हे पक्षाला सोडचिठ्ठी देणार ...

ठळक मुद्दे'मी भाजपक्षातच' : भाजपच्याच एका पदाधिकाऱ्यावर संशय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलहाला कंटाळून प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण पोटे हे पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे वृत्त अकोला येथील एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून व्हायरल करण्यात आले आहे. हा मजकूर बदनामीकारक असल्याची तक्रार माजी राज्यमंत्री तथा विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे यांनी सोमवारी गाडगेनगर ठाणे, सायबर सेल व पोलीस आयुक्तांकडे नोंदविली.राज्याच्या राजकारणातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर या बदनामीकारक मजकुरामागे कोण, याचा शोध आमदार प्रवीण पोटे यांनी आपल्यापरीने घेतला. एका भाजप पदाधिकाऱ्यांकडे संशयाची सुई वळत असल्याची माहिती आहे. सध्याच्या राजकीय अस्थैर्याच्या काळात प्रवीण पोटे यांना बदनाम करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप होत आहे. पोलीस तपासात काय तथ्य बाहेर येते, याकडे आता लक्ष केंद्रीत झाले आहे.‘मी भाजपा सोडतोय’ वॉलवर दिसण्याची भविष्यवाणीसध्या ‘मी भाजपा सोडतोय’ हा ट्रेंड सोशल मीडियावर सध्या सुपरहीट ठरत आहे. त्यामुळे प्रवीण पोटे यांच्या वॉलवरही हे वाक्य दिसण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा मजकूर या पोस्टमध्ये आहे. पोटे लवकरच काँग्रेसचा ‘हात’ पकडतील, याबाबत काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी बैठक झाल्याचेही यामध्ये नमूद आहे. फडणवीस मोदींचा कित्ता गिरवित असल्याने एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि आता प्रवीण पोटे हे त्यांच्या राजकीय खेळीचे बळी ठरल्याचेही या पोस्टमध्ये नमूद आहे.कोण हे जयंत गडकरी?प्रवीण पोटे हे विदर्भातील शिक्षणसम्राट असल्यानेच जयंत गडकरी यांचे विश्वासू सहकारी असल्याचे या मजकुरात नमूद आहे. पोटे हे तिवसा विधानसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक होते. त्यांना गडकरींच्या कोट्यातून तिकीट मिळाले. ऐनवेळी फडणवीसांनी गडकरींच्या कोट्यातील तिकिटांना कचºयाची टोपली दाखवीत ‘फडणवीस है तो मुमकीन है’ असं मोदींच्या पावलावर पाऊल टाकत सिद्ध केल्याचा मजकूर या पोस्टमध्ये आहे. त्यामुळे हे जयंत गडकरी कोण, हा विषय चर्चेचा झाला आहे. ही राजकीय बातमी विविध राजकीय पक्षांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर झळकत आहे. त्यामुळे आमदार पोटे यांनी याविषयी थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली.भाजपा सोडण्याचा प्रश्नच नाही, पोटे यांचा खुलासाभारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी कार्यरत असताना, अन्य पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी कुठेही अशा प्रकारचे विधान केलेले नाही. काँग्रेसमध्ये जाण्याची बातमी सोशल मीडियावरून प्रसिद्ध करून मला हेतुपुरस्सर बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात माझ्याविषयी असंतोष निर्माण करण्याचा त्यामागे उद्देश असल्याचे आमदार प्रवीण पोटे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :Pravin Poteप्रवीण पोटेBJPभाजपा