शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील कोलकास-सेमाडोह व्हॅलीत बायटींग कोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 15:10 IST

मेळघाटातील कोलकास-सेमाडोह व्हॅलीत बायटींग कोल्डने कहर केला आहे. चिखलदरा व कुकरूत रात्रीचे तापमान 4 डिग्री सेल्सिअसवर आले आहे. चिखलदरा परिसरात दवबिंदू गोठू लागले आहेत.

ठळक मुद्देमेळघाटातील कोलकास-सेमाडोह व्हॅलीत बायटींग कोल्डने कहर केला आहे.चिखलदरा व कुकरूत रात्रीचे तापमान 4 डिग्री सेल्सिअसवर आले आहे. 29 डिसेंबरला चिखलदऱ्यात दिवसाचे तापमान 20 डिग्री, तर रात्रीचे तापमान 4 डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले आहे.

अनिल कडू

परतवाडा (अमरावती) - मेळघाटातील कोलकास-सेमाडोह व्हॅलीत बायटींग कोल्डने कहर केला आहे. चिखलदरा व कुकरूत रात्रीचे तापमान 4 डिग्री सेल्सिअसवर आले आहे. चिखलदरा परिसरात दवबिंदू गोठू लागले आहेत.

चिखलदऱ्यापासून दोन किलोमीटर अंतरावर आलाडोह-मोथ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खोलगट भागातून वाहणाऱ्या ब्रम्हसती नदीलगतच्या सपाट भागात दवबिंदू गोठत आहेत. याठिकाणी चिखलदऱ्यापेक्षाही अधिक थंडी आहे. पहाटे 4 ते 5 वाजता दरम्यानचे तापमान 4 डिग्री सेल्सिअसहूनही कमी होत असल्यामुळे मागील दोन दिवसांपासून दवबिंदू या परिसरात गोठत आहेत. यामुळे गवतांवर व झुडपांवर बर्फाचे आच्छादन पसरल्याचे दृश्य बघायला मिळत आहे. पहाटे सहानंतर तापमानात वाढ होत असल्याने गोठलेल्या दवबिंदूचे परत पाण्यात रूपांतर होत आहे.

चिखलदऱ्याच्या समकक्ष उंचीवर असलेल्या मध्यप्रदेशातील कुकरू येथेही रात्रीचे तापमान 4 ते 3 डिग्री सेल्सिअस दरम्यान आहे. बैतूल जिल्ह्यातील भैसदेही तालुक्यात येत असलेले कुकरू, परतवाडा-धारणी रोडवरील घटांगपासून अवघ्या 6 मैल अंतरावर आहे. या ठिकाणीही शीतलहरने कहर केला आहे. महाराष्ट्रातील चिखलदरा आणि मध्यप्रदेशातील कुकरू येथील वातावरणात बरेच साम्य असले तरी चिखलदऱ्यापेक्षा कुकरूत अधिक थंडी जाणवत आहे. चिखलदऱ्याप्रमाणेच कुकरूतही कॉफीचे वृक्ष आहेत. सन 1906 मध्ये इंग्रजांनी बांधलेले विश्रामगृह तेथे असून ब्रिटिश महिला मि. फ्लोरेंस हेंड्रीक्सने 44 हेक्टर क्षेत्रात, सन 1944 मध्ये हा कॉफीचा बगीचा लावला आहे. 

29 डिसेंबरला चिखलदऱ्यात दिवसाचे तापमान 20 डिग्री, तर रात्रीचे तापमान 4 डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले आहे. कुकरूचे दिवसाचे तापमान 19 डिग्री, तर रात्रीचे 4 डिग्री सेल्सिअस दाखवण्यात आले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत कोलकास आणि सेमाडोह व्हॅलीत बायटींग कोल्डने कहर केला आहे. मागील दोन दिवसांपासून अंगावर कितीही ब्लँकेट किंवा रजई घेतल्यात तरी ही थंडी थांबत नाही. या थंडीने पर्यटकांसह स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. जर एखाद्याला धडा शिकवायचा असेल तर त्याला पर्यटक म्हणून सेमाडोह-कोलकास येथे या दिवसात मुक्कामी पाठवावे. इतपत या बायटींग कोल्डचा प्रकोप आहे. इंग्रजांनीसुद्धा या बायटींग कोल्डचा उल्लेख केला आहे. दरवर्षी शीतलहर वाढली आणि तापमान घसरले की कोलकास व्हॅलीतील या थंडीचा परिणाम जाणवतो.

चिखलदरा आणि कुकरू पेक्षा कोलकास-सेमाडोह येथील रात्रीचे तापमान अधिक असले तरी चावा घेणारी ही थंडी कोलकास-सेमाडोह परिसरातच आहे. 29 डिसेंबर रोजी कोलकास येथील दिवसाचे तापमान 25 डिग्री सेल्सिअस, तर रात्रीचे तापमान 8 डिग्री सेल्सिअस दाखविण्यात आले आहे. या तापमानातही दिवसभर 11 डिग्री सेल्सिअस तापमानावरील वातावरण राहणार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती