शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष्यांची पंढरी झाली ‘प्लास्टिकमय’, अधिवास धोक्यात...

By गणेश वासनिक | Updated: June 4, 2023 15:52 IST

प्लास्टिक प्रदूषणावर उपाय शोधण्यात शासन, प्रशासन अपयशी

गणेश वासनिक, अमरावती: महाराष्ट्र ही ‘पक्ष्यांची पंढरी’ म्हणून सर्वपरिचित आहे. विविध प्रकारच्या स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांची मांदियाळी ईथे पहायला मिळते. पक्षी, पक्षिमित्र व छायाचित्रकारांसाठी राज्यातील तलाव म्हणजे जीव की प्राणच आहे. आजवर अनेक दुर्मिळ पक्ष्यांची नोंद येथे झालेली आहे. मात्र आता ह्या जलीय परिसंस्था प्लास्टिकमय झाल्या आहे. तलावाच्या मागील बाजूला अक्षरशः प्लास्टिक द्रोण, प्लास्टिक पत्रावळीचा मोठा थर साचला आहे. यामुळे पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे.

राज्यात विशेषत: एकूण ६४ प्रकारच्या स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ५४१ पक्ष्यांपैकी २८५ प्रकारचे पाणपक्षी व २५६ प्रकारचे रानपक्ष्यांचा समावेश आहे. म्हणजेच एकूण ५४१ पक्ष्यांपैकी २८५ म्हणजेच ५२ टक्के पक्ष्यांचा अधिवास हा जलीय परिसंस्थेशी निगडित आहे. विशेषतः तलावाच्या मागच्या बाजूच्या काठावरील पाणथळ ठिकाणच्या चिखलात अनेक पक्षी आपली गुजराण करतात. पक्ष्यांची तर संपूर्ण जीवनक्रियाच या चिखलाणीवर अवलंबून असते. चिखलाणीमधील कीटक व इतर जीव या पक्ष्यांचे मुख्य खाद्य असते. आता या काठावर संपूर्ण प्लास्टिक साचल्यामुळे पक्ष्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यंदा जागतिक पर्यावरण दिनाची मध्यवर्ती संकल्पना ‘प्लास्टिक प्रदूषणावर उपाय’ अशी असली तरी प्रशासन ढिम्म असल्याचे वास्तव आहे०००००००००००००००स्थानिक व विदेशी पक्ष्यांची पंढरी म्हणून महाराष्ट्राची ख्याती आहे. साचलेल्या प्लास्टिकमुळे जलीय परिसंस्था प्रदुषित झाली. नागरिकांनी तलाव, नद्या व इतर परिसंस्थामध्ये प्लास्टिक व इतर प्रदूषण होणारे साहित्य टाकू नये. पक्षी अन्नसाखळी मधील महत्वाचा घटक असून मानवाचे अस्तित्व त्यांच्यावर अवलंबून आहे. पक्षी वाचतील तरच मानवप्राणी वाचेल याची जाणीव ठेऊन पक्षी संवर्धन करण्यास मदत करावी.- यादव तरटे पाटील, वन्यजीव अभ्यासक, अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावती