शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
2
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
3
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
4
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
5
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
6
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
7
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
8
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
9
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
10
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
11
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
12
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
14
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
15
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
16
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
17
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
18
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
19
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
20
कोण म्हणतं वय झालं? ८६ आणि ८४ वर्षांच्या दोन बहिणींनी ठरवलं जग पहायचं, आणि निघाल्या..

पथदिव्यांचे थकीत वीज बिल ग्रामपंचायतींच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 22:06 IST

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील दिव्यांचे थकीत वीज बिल शासनाने ग्रामपंचायतींच्या माथी मारले आहे. ही रक्कम ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून, चौदाव्या वित्त आयोगातून किंवा इतर निधीतून भागवावी, असे पत्र ग्रामविकास विभागाने काढले आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेला पत्र: जिल्ह्यातील थकबाकी ६६ कोटींवर

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील दिव्यांचे थकीत वीज बिल शासनाने ग्रामपंचायतींच्या माथी मारले आहे. ही रक्कम ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून, चौदाव्या वित्त आयोगातून किंवा इतर निधीतून भागवावी, असे पत्र ग्रामविकास विभागाने काढले आहे. हे पत्र सर्व जिल्हा परिषदांना अतितात्काळ म्हणून पाठविले आहे.ग्रामपंचायतींच्या हद्दीतील पथदिव्यांचे बिल शासनस्तरावरून भरले जाते. हे वीज बिल ग्रामपंचायतीकडून भरले जात नव्हते. मध्यंतरी या पथदिव्यांच्या थकीत वीज बिलामुळे महावितरणने अनेक ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची वीज तोडली होती. मध्यंतरी राज्यभरातील हा प्रश्न काही जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिला. त्यावेळी मुख्यमंत्र्यानी ‘प्रकाशगड’शी संपर्क साधून पथदिव्याच्या जोडणीचे आदेश दिले होते. पथदिव्याच्या थकीत बिलाचा प्रश्न राज्यभर आहे.राज्यभरातील ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्याची सुमारे ३०० कोटीची वीज बिले शासनस्तरावर थकीत असल्याची माहिती आहे. यामध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडे ६६ कोटींपेक्षा जास्त वीज बिले थकीत आहेत. दरम्यान, ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेला पत्र पाठवून वीज बिले भरण्याच्या सूचना केल्या. यानुसार राज्यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरील दिव्यांची बरीचशी वीज बिले थकीत असल्याचे निदर्शनास आले आहे.जिल्ह्यात अशी आहे थकबाकीग्रामपंचायतींच्या हद्दीतील १हजार ८०९ ग्राहकांकडे पथदिव्याची वीज बिलाची थकबाकी आहे. याची रक्कम ६६ कोटींहून अधिक आहे. महावितरणच्या चार विभागांपैकी अचलपूर विभागातील ७३७ ग्राहकांकडे १३ कोटी ९७ लाख १६ हजार ३२९, मोर्शी ३५४ ग्राहकांकडे ८ कोटी ५६ लाख १३ हजार ८५१, अमरावती शहर विभागात ३ ग्राहकांकडे ७२ हजार ७२३, अमरावती ग्रामीण ७१५ ग्राहकांकडे ४४ कोटी १३ लाख २५ हजार ३०७ रुपये थकबाकी असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, थकबाकीदार ग्रामपंचायतींनी थकीत रक्कम भरून अडचणीत असलेल्या महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.आतापर्यंत पथदिव्यांची वीज देयके शासनास्तरावरू न भरली जात होती. आता थकीत रक्कम भरण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने काढून ग्रामपंचायतींवर आर्थिक बोजा टाकला आहे. शासनानेच थकीत रक्कम भरावी.- नितीन गोंडाणेअध्यक्ष, जिल्हा परिषद