-------------------------------------------------------------
घरातून पैसे लंपास
अमरावती : घरात प्रवेश करून घरातील पैसे, सिलिंडर, साड्या व इतर वस्तू असा एकूण १८०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ९ ते १४ डिसेंबर दरम्यान वनग्राम येथे घडली. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला. फिर्यादी अरुण विठ्ठलराव वडगावकर (५२, रा. अंगणवाडी वसतिगृह वनग्राम क्वार्टर शिवाजीनगर) यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. फिर्यादी हे बाहेरगावी गेले होेते, परत आल्यानंतर त्यांना घरातील कडीकोंडा तुटलेला दिसला.
----------------------------------------------------------------------------------
मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये चोरी
अमरावती : येथील सरस्वतीनगरातील मेडिकेअर हास्पिटलमधील सीपीयू, मॉनिटर, बेडसीट असा एकूण २५ हजारांचा ऐवज अज्ञाताने लंपास केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. डॉ. योगेश प्रकाशराव साव (३७, रा. यशोदानगर) यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
-------------------------------------------------------------
दर्याबाद येथून शेतीचे साहित्य लंपास
अमरावती : वलगाव ठाणे हद्दीतील दर्याबाद शेतशिवारातून ७,२०० रुपये किमतीचे शेती अवजार चोरीला गेल्याची घटना १२ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला. वलगाव ठाण्यात एका महिलेने तक्रार नोंदविली.
-------------------------------------------------------------