शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीला भेटण्यापूर्वीच भावावर काळाची झडप; दुचाकी अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2022 14:23 IST

हनवतखेडा फाट्यानजीक अपघात

परतवाडा/पथ्रोट (अमरावती) : परतवाडा-अंजनगाव मार्गावरील हनवतखेडा फाट्यानजीक बहिणीस घ्यायला निघालेल्या भावाच्या दुचाकीला ट्रकची धडक लागली. दुचाकीचालक अपघातात गंभीर जखमी होऊन ठार झाला. ही घटना सायंकाळी ५:३० च्या सुमारास घडली.

एमएच २७ एक्स २८५६ क्रमांकाचा ट्रक परतवाड्याकडून अंजनगावकडे जात असताना समोरील टायर फुटल्यामुळे गती अनियंत्रित झाली आणि परतवाड्याकडे येणाऱ्या एमएच २७ सीआर ११६८ क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. यात दुचाकीस्वार ठार झाला. रोशन वामनराव पडोळे (३०, रा. शिवणी बु., ता. भातकुली) असे मृताचे नाव आहे. तो पथ्रोट येथे बहिणीकडे येत होता. ट्रकच्या धडकेनंतर तरुण घटनास्थळी गंभीर जखमी अवस्थेत बराच वेळ पडून होता. दरम्यान, सावळी येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी शासकीय रुग्णवाहिकेकरिता मोबाइल क्रमांक डायल केले. तथापि, रुग्णवाहिका ताबडतोब घटनास्थळी दाखल न झाल्याने त्याचा तडफडून मृत्यू झाला.

महामार्गावर अपघातांची मालिका

गेल्या दोन महिन्यांपासून परतवाडा-अंजनगाव महामार्गावर अपघातांची मालिका सुरु आहे. हा सहावा अपघात असून, प्रत्येक अपघातात जखमी घटनास्थळी दगावला आहे. परतवाडा पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास ठाणेदार चव्हाण करीत आहेत.

कुटुंबात दोन महिन्यात दोन मृत्यू

पथ्रोट येथील तेलंगखडी भागात रोशनच्या बहिणीचे सासर आहे. बडवाईक कुटुंबात सुनेला माहेरी पाठविण्याची तयारी झाली असतानाच अपघाताचे वृत्त धडकले. त्याच्या पश्चात आई, चार बहिणी आहेत. वडिलांचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर तोच कर्ता होता.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAmravatiअमरावती