शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

दुचाकी स्लिप झाल्याने कोसळला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला, चेनस्नॅचर अटकेत

By प्रदीप भाकरे | Updated: December 9, 2022 20:32 IST

तरूणाच्या पाठलागाने ‘ऑन द स्पॉट’ अटक

अमरावती: रस्त्याने पायदळ जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील दोन लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या इसमाची दुचाकी स्लिप झाल्याने तो कोसळला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला. किरणनगरस्थित दि विदर्भ प्रिमियर को. ऑप. हाउसिंग सोसायटी वॉल कम्पाउंडच्या बाजुच्या रस्त्यावर शुक्रवारी दुपारी २.३० ते ३ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी जितेंन्द्र माणीकराव जावरे, (रा. छांगाणीनगर, रविनगर, अमरावती) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरूध्द फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहेे.

किरणनगरमधील प्रणिता नामक ४७ वर्षीय गृहिणी या शुक्रवारी सकाळी मंगलधाम परिसरातील एका लग्नसोहळ्यात सहभागी झाल्या. लग्न सोहळा आटोपून त्या शेजारी महिलांसोबत दुपारी दोनच्या सुमारास मंगलधाम परिसरातील एक्सप्रेस हायवे रोडने पायी किरणनगरकडे निघाल्या. दुपारी २.३० च्या सुमारास त्या किरणनगर येथील दि विदर्भ प्रिमियर को. ऑप. हाउसिंग सोसायटीलगतच्या रस्त्यावर असताना समोरून एक दुचाकीस्वार आला. त्याने प्रणिता यांच्या सुमारे ५५ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून नेले. त्यामुळे प्रणिता व त्यांच्यासोबत असलेल्या सर्वजणी ओरडल्या.

पाठलागामुळे तो सैरावळ

तेवढ्यात मागून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने मदतीचा हात पुढे करत प्रणिता यांना दुचाकीवर बसविले. त्या निर्मल नामक मुलासह प्रणिता यांनी मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या दुचाकीस्वााराचा पाठलाग केला. तो इसम दस्तुरनगर बायपास रोडवरील शिवानंद हाईट्स अपार्टमेन्ट दस्तुरनगरच्या बाजुला शिरला. मात्र, तेथे त्याची दुचाकी स्लिप झाल्याने तो दुचाकीसह कोसळला. तेवढयात पोहोचलेल्या फ्रेजरपुरा पोलिसांनी त्याला पकडले. पडल्यामुळे तो जखमी देखील झाला. दरम्यान त्याने स्वत:चे नाव जितेंन्द्र जावरे असे सांगीतले. त्याच्याकडून एमएच २८ एडी ७३४७ ही दुचाकी देखील जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे आरोपीकडून मंगळसूत्र हस्तगत झालेले नाही. पळत असताना ते त्याने सहकाऱ्याकडे दिले असावे, वा फेकले असावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. 

आरोपी चेनस्नॅचरला ‘ऑन द स्पॉट’ पकडण्यात आले. आरोपीकडून दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्याला शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. अटकेनंतर मंगळसूत्र रिकव्हर करण्यात येईल.- नितीन मगर, पोलीस निरिक्षक, फ्रेजरपुरा

 

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी