शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात बाईक अ‍ॅम्ब्युलन्स धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:47 IST

मेळघाटातील दुर्गम, अतिदुर्गम भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासींना जलदगतीने आरोग्य सेवा मिळावी, यासाठी बाईक अ‍ॅम्ब्युलन्स सुरू करण्यात आली. मात्र, आजमितीला या बाईक अ‍ॅम्ब्युलन्स धूळखात पडल्या आहेत.

ठळक मुद्देआरोग्य सेवेचा बोजवारा : प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी अनभिज्ञ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाटातील दुर्गम, अतिदुर्गम भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासींना जलदगतीने आरोग्य सेवा मिळावी, यासाठी बाईक अ‍ॅम्ब्युलन्स सुरू करण्यात आली. मात्र, आजमितीला या बाईक अ‍ॅम्ब्युलन्स धूळखात पडल्या आहेत. आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. तथापि, बाईक अ‍ॅम्ब्युलन्स सेवेच्या मोबदल्यात शासन तिजोरीतून कंपनीला शुल्क अदा केले जात आहे.शासनाच्या आरोग्यसेवा विभागाने छत्तीसगडच्या धर्तीवर मेळघाटात बाईक अ‍ॅम्ब्युलन्स सेवेला प्रारंभ डिसेंबर २०१८ मध्ये प्रारंभ केला. नागपूर हिवाळी अधिवेशन काळात या उपक्रमाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. टेंभु्रसोंडा, काटकुंभ, बैरागड व हरिसाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आदिवासींच्या आरोग्य सेवेकरिता बाईक अ‍ॅम्ब्युलन्स ठेवण्यात आल्यात. परंतु, हल्ली या अ‍ॅम्ब्युलन्स धूळखात पडल्या आहेत. दुर्गंम, अतिदुर्गम भागातून किती आदिवासी रूग्णांची ने-आण बाईक अ‍ॅम्ब्युलन्सने करण्यात आली, याची आकडेवारी जिल्हा परिषद आरोग्य विभाग अथवा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे उपलब्ध नाही. त्यामुळे मोठा गाजावाजा करून सुरू झालेली ही सेवा केवळ शासन निधी लाटण्यासाठी तर नाही ना, असा सूर उमटला आहे. पुणे येथील बीव्हीजी कंपनीकडून बाईक अ‍ॅम्ब्युलन्स आरोग्य सेवेचा करार करण्यात आला. मात्र, या सेवेसाठी ना डॉक्टर, ना वाहने अशी दयनीय अवस्था मेळघाटातील आरोग्य सेवेची आहे. या सेवेकरिता १२ ते १५ हजार रूपयांच्या मानधनावर कंपनीकडे डॉक्टर नेमले. मात्र, मेळघाटात तोकड्या मानधनावर डॉक्टरांना परवडत नसल्याने तेदेखील सोडून गेल्याची माहिती आहे. मध्यंतरी आरोग्य सेवकांची नेमणूक करण्यात आली. परंतु, त्यांच्या निवासाची व्यवस्था बीव्हीजी कंपनीकडून झाली नाही. त्यामुळे आरोग्य सेवकांनीसुद्धा मेळघाटातून पळ काढला आहे. परिणामी बाईक अ‍ॅम्ब्युलन्स धूळखात पडल्याची माहिती आहे.पुणे येथून नियंत्रणमेळघाटातील आरोग्य सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या बाईक अ‍ॅम्ब्युलन्सवर नियंत्रण पुणे येथून चालते. आरोग्य सेवेकरिता बाईक अ‍ॅम्ब्युलन्सची गरज पडल्यास कॉल सेंटरवर संपर्क करावा लागतो. त्यानंतर पुणे येथून सदर बाईक अ‍ॅम्ब्युलन्स चालकाला गाव, स्थळ कळविले जाते. मात्र, काही महिन्यांपासून ही वाहने धूळखात पडली आहे. चालक नाही, डॉक्टर नाही. त्यामुळे ही सेवा मेळघाटात कशी राबविणार, असा सवाल आदिवासींचा आहे.मेळघाटात पाच बाईक अ‍ॅम्ब्युलन्स आहेत. मध्यंतरी या सेवेकरिता मनुष्यबळाचा अभाव होता. बीव्हीजी कंपनीला ही बाब कळविली आहे. बाईक अ‍ॅम्ब्युलन्स आरोग्य सेवेची काय स्थिती आहे, याबाबत अहवाल मागविला जाईल.- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती.

टॅग्स :Healthआरोग्य