शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2022 05:01 IST

खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना जनतेने विकासासाठी निवडून दिले. परंतु राणा दाम्पत्य हे विकासाची कामे सोडून देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे भीम आर्मी संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे भीम आर्मीने राणा दाम्पत्याच्या घरासमोर संविधान प्रस्तावना वाचण्याचा निर्णय घेतला होता. परंतु अनुचित घटना घडू नये यासाठी राणा दाम्पत्याच्या घराबाहेर  पोलीस बंदोबस्त लागला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राणा दाम्पत्याच्या घरासमोर संविधान प्रस्तावना वाचण्याचा इशारा भीम आर्मीने दिला होता. त्यामुळे पोलिसांनी राणा दाम्पत्याच्या घरापासून ५०० मीटर अंतरावरच भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना अडवले. यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी याचठिकाणी संविधान प्रस्तावनेचे वाचन करत, राणा दाम्पत्याविरोधान जोरदार घोषणाबाजी करत संविधानाचा जयघोष केला. यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत गुन्हे नोंदवून सोडून दिले. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना जनतेने विकासासाठी निवडून दिले. परंतु राणा दाम्पत्य हे विकासाची कामे सोडून देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे भीम आर्मी संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे भीम आर्मीने राणा दाम्पत्याच्या घरासमोर संविधान प्रस्तावना वाचण्याचा निर्णय घेतला होता. परंतु अनुचित घटना घडू नये यासाठी राणा दाम्पत्याच्या घराबाहेर  पोलीस बंदोबस्त लागला होता. यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी राणा दाम्पत्याच्या घरापासून ५०० मीटर अंतरावरच अडवले. यावेळी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष रितेश तेलमोरे, प्रदीप उसरे, आकाश इंगळे, अक्षय देशमुख, दीपक बोरकर, किरण काठाणे, भूषण चव्हाण, आकाश डोळस, अमर डोळस, अजय डोळस, हरिष देशमुख, सैय्यद नाझिम, शेख शारुक  आदी उपस्थित होते.

संविधान वाचण्यासाठी घराबाहेर पाय पडेना

खासदार नवनीत राणा यांनी आता थेट काश्मीरमध्ये हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे म्हटले आहे. तर शुक्रवारी भीम आर्मीने राणा दाम्पत्यांच्या घराबाहेर संविधान प्रस्तावना वाचण्याचा इशारा दिला होता. परंतु, पोलिसांनी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना राणा दाम्पत्याच्या घराजवळ पोहोचण्यापूर्वीच ताब्यात घेतले. त्यामुळे युवा स्वाभिमानच्या  पदाधिकाऱ्यांनीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करीत संविधान प्रस्तावनेचे वाचन केले. या प्रस्तावना वाचनाच्या वेळी खासदार राणा या घरीच होत्या. परंतु त्या संविधान प्रस्तावनेच्या वाचनासाठी कार्यकर्त्यांसोबत न आल्याने घराबाहेर पाय का पडत  नाही, अशी चर्चा रंगली.

 

टॅग्स :Bhim Armyभीम आर्मीRavi Ranaरवी राणा