शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या उन्नतीसाठी कृषी विद्यापीठाची निर्मिती ही भाऊसाहेबांचीच संकल्पना - पांडुरंग फुंडकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 19:54 IST

 अमरावती -  देशातील शेतक-यांची उन्नती व्हावी. तो जगाच्या बरोबरीने चालला पाहिजे,  त्याला सन्मानाने जगता आले पाहिजे. यासाठी  डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे केंद्रीय कृषि मंत्री झाल्यानंतर त्यांनी राज्यात कृषी विद्यापीठ स्थापन करण्याची संकल्पना मांडली. आज राज्यात चार कृषी विद्यापीठे असून अनेक  कृषी महाविद्यालये आहेत. त्याकाळात भाऊसाहेबांनी शेतकºयांसाठी केलेले कार्य ...

 अमरावती -  देशातील शेतक-यांची उन्नती व्हावी. तो जगाच्या बरोबरीने चालला पाहिजे,  त्याला सन्मानाने जगता आले पाहिजे. यासाठी  डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे केंद्रीय कृषि मंत्री झाल्यानंतर त्यांनी राज्यात कृषी विद्यापीठ स्थापन करण्याची संकल्पना मांडली. आज राज्यात चार कृषी विद्यापीठे असून अनेक  कृषी महाविद्यालये आहेत. त्याकाळात भाऊसाहेबांनी शेतकºयांसाठी केलेले कार्य अनमोल असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले. ते दर्यापूर येथील आदर्श हायस्कूल तथा कनिष्ट महाविद्यालयात शाळेच्या अमृत महोत्सवानिमित्त नवीन इमारतीचे उद्घाटन व शिक्षण महर्षी भाऊसाहेब देशमुख यांच्या ११९ व्या जयंत्युत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, नगराध्यक्षा  नलिनी भारसाकळे, संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र शेळके, नरेशचंद्र ठाकरे,  कोषाध्यक्ष दिलीपबाबु  इंगोले, कार्यकारी सदस्य हेमंत काळमेघ, केशवराव गावंडे, केशवराव मेतकर, अशोकराव ठुसे, प्राचार्य रामेश्वर भिसे, बापूसाहेब कोरपे, मधुकर तराळ, पी.डी. बाबनेकर, दीपक हिरूळकर आदी उपस्थित होते.भाऊसाहेबांनी त्या काळात कृषी विद्यापीठाची संकल्पना मांडून शेतकºयांना नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी नवीन बियाणे उत्पादित केली पाहिजे. नवीन बियांणाचे संशोधन व्हावे. कमी खर्चात शेतकºयांना अधिक उत्पादन देणारे बियाणे निर्माण करता यावी. तसेच कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून तयार झालेल्या शेतीचे यांत्रिकीकरण झाले पाहिजे या विचारांतून ही संकल्पना मांडली व साकारलीसुद्धा. त्यामुळेच त्या आज शेतकºयांना बळ मिळाल्याचे ना. फुंडकर म्हणाले. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनीही भाऊसाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी खा. आनंदराव अडसूळ, आ. रमेश बुंदिले यांनी मनोगत व्यक्त केले. भाऊसाहेबांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. विद्यार्थ्यांनी आसाममधील लोकनृत्य व योगाचे प्रात्यक्षिके लेझीम नृत्याचे सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रास्ताविक प्रचार्य विजय खोरगडे  यांनी, तर संचालन डी.बी. ठाकरे, व ज्योती टेवरे यांनी केले. आभार उत्सवप्रमुख सुरेश घोगरे यांनी मानले. यावेळी सर्व आजीवन सदस्य, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.  

 शेतक-यांना आठ हजार नवीन ट्रॅक्टर देणार    शेतकरी शेती अवजारे व ट्रॅक्टर घेतील, त्यावरील सबसिडी त्वरित देऊन  मंजुर असलेला अर्ज दारांनी कुठल्याही कंपनीचे ट्रॅक्टर व राटाव्हेटर व पेरणीयंत्र  खरेदी करावे. त्यांना त्यामध्ये सबसीडी देऊन ट्रक्टर देण्यात येईल. आतापर्यंत राज्यात चार हजार शेतक-यांना शासनाने ट्रॅक्टरचे वाटप केले असून मार्चपर्यंत आठ हजार नवीन ट्रॅक्टर शासन शेतक-यांना देणार असल्याचे यावेळी कृषिमंत्री फुंडकर यांनी सांगितले. भाऊसाहेबांच्या जन्मगावी पापळ येथे कृषी महाविद्यालय देण्यात येणार असल्याचेही यावेळी घोषणा केली.

टॅग्स :Pandurang Phundkarपांडुरंग फुंडकर