शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

जिल्हा कचेरीवर उधळला भंडारा, धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटणार

By उज्वल भालेकर | Updated: September 26, 2023 19:50 IST

सकल धनगर समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात.

उज्वल भालेकर, अमरावती : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. याच मागणीसाठी चौंडी येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देत, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकल धनगर समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी परिसरात भंडारा उधळण्यात आला; तसेच कपाळावर भंडारा लावून धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत आरक्षणाच्या मागणीचे निवेदन दिले.

धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही. त्याामुळे ७६ वर्षांपासून धनगर बांधवांना आपल्या हक्कावर पाणी सोडावे लागल्याचे धनगर शिष्टमंडळाने म्हणने आहे. धनगर बांधवांनी अनेकवेळा निवेदन व आंदोलने करूनही शासनाने त्याची दखल घेतलेली नाही. २०१४ च्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ते सत्तेत आल्यावर पहिल्याच कॅबिनेट बठकीमध्ये धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळेच धनगर समाजाने त्यांना मतदान केेले; परंतु भाजप सत्तेत आल्यानंतर एकदाही धनगर आरक्षणाचा प्रश्न त्यांनी मांडला नसल्याचे धनगर समाजाचे म्हणने आहे. त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न आता चिघळला आहे. राज्य व केंद्र सरकारने धनगरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी धनगर समाजाला आरक्षण घोषित करा, अन्यथा लोकप्रतिनिधींना रस्त्यावर फिरकू देणार नाही, असा इशारा सकल धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

आरक्षणाची लढाई ही स्वतंत्र धनगर समाजाची आहे. समित्या व बैठकांच्या भूलथापांना आता धनगर समाज भीक घालणार नाही, असा इशाराही यावेळी निवेदनातून देण्यात आला आहे. साखळी उपोषणाच्या पहिल्या दिवशी ॲड. दिलीप एडतकर, ॲड. अचल कोल्हे, विनय पुनसे, अरुण बांबल, भास्कर ढेवले, प्रदीप अलोने, शंकर ढवले, उमेश घुरडे, नंदा चापले, प्रा.राजश्री टेकाडे, प्रतिभा उमेकर, विनिता गादे, शारदा ढवळे, मेघा बोबडे, वंदना गायनर, छबू मातकर, प्रेमा लव्हाळे, कैलास निंघोट, ज्ञानेश्वर ढोमने, अशोक इसळ, जानराव घटारे, रामकृष्ण गावनर, भास्कर पुनसे, अंबादास चारथळ, डॉ. बाबूराव नवले, मनोहर पुनसे, अशोक लव्हाळे आदी समाजबांधव सहभागी झाले होते.

टॅग्स :Dhangar Reservationधनगर आरक्षण