शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! कोरोनाचा 'कम बँक' सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 13:15 IST

Amravati : स्वाइन फ्लूचा एक रुग्ण 'इर्विन'मध्ये दाखल; चाचण्यांना येणार वेग

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : अमरावती शहरात नव्याने सहा कोरोना पॉझिटिव्ह, तर एक रुग्ण स्वाइन फ्लूचा आढळल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. बुधवारी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या नमुने चाचणीच्या अहवालातून ही बाब निदर्शनास आली आहे. त्याअनुषंगाने आरोग्य यंत्रणेने उपाययोजना आखण्यास प्रारंभ केले असून, नमुने तपासणीवर भर दिला जाणार आहे.

हल्ली पावसाळा असल्यामुळे वातावरणातील बदल आणि साथरोगांची लागण मोठ्या प्रमाणात होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे कोरोनाने डोके वर काढल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यंदा उन्हाळ्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र, आता पावसाळ्यात साथरोगांची लागण वाढली असून, शासकीय खासगी रुग्णालयात रुग्णाची संख्या दरदिवशी वाढतच आहे. अशातच जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून २४ ते ३० जुलै यादरम्यान एकूण १४० जणांचे नमुने चाचणीसाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत पाठविले असता यात सहाजण कोरोना पॉसिटीव्ह, तर एक रुग्ण स्वाईन फ्लूचा आढळला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वाइन फ्लूच्या ६० वर्षीय रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालय हाऊसफुल्ल, नव्याने आव्हान

  • येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गत १५ दिवसांपासून साथरोगाचे रुग्ण वाढले आहेत. एका बेडवर दोन ते तीन रुग्णांवर उपचार ही अलीकडे नित्याचीच बाब झाली आहे. तर तोकड्या कर्मचारी व्यवस्थेमुळे इर्विन'ची आरोग्य यंत्रणा सलाइनवर असल्याचे वास्तव आहे.
  • अशातच आता कोरोनाचे नवे आव्हान उभे ठाकल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणासमोर निधी आणि कर्मचारी अशा दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार आहे.

सहा पॉझिटिव्ह रुग्ण शहरातीलचअमरावती विद्यापीठाने १४० नमुन्यांची तपासणी केली असून यात सहाजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात अंबा विहार येथील ५५ वर्षीय पुरुष, साईनगर येथील ३२ वर्षीय युवक, गोपालनगर येथील ४२ वर्षीय पुरुष, विलासनगर येथील ५६ वर्षीय पुरुष, सराफा काळाराम मंदिर येथील २४ वर्षीय युवक, तारखेडा येथील ५० वर्षीय पुरुषाचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून समावेश आहे. १४० जणांमध्ये ४३ महिलांचे नमुने चाचणीकरिता पाठविले असता यात एकाही महिलेचे नमुने पॉझिटिव्ह आढळून आले नाहीत.

"जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून २४ ते ३० जुलै यादरम्यान घेण्यात आलेल्या १४० जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात सहाजण कोरोना पॉझिटिव्ह, तर एकजण स्वाइन फ्लूची लागण असल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले. वातावरणातील बदलामुळे कोरोनाचे रुग्ण आढळून येत असावेत. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे."- प्रशांत ठाकरे, नोडल अधिकारी, प्रयोगशाळा, अमरावती विद्यापीठ. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAmravatiअमरावती