खबरदार ! कायदा हाती घ्याल तर सोडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 06:00 AM2019-10-14T06:00:00+5:302019-10-14T06:00:49+5:30

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सीपी संजयकुमार बाविस्कर यांच्याशी 'लोकमत'ने संवाद साधला असता, जनसामान्यांमध्ये विश्वास संपादन करू, त्यांच्या सहकार्याने विधानसभा निवडणुकीचे मिशन यशस्वी करू व गुन्हेगारीवर वचक ठेवू, असे ते म्हणाले. निवडणूक भारतीय लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा अंग आहे.

Beware! If you take the law, it will not go away | खबरदार ! कायदा हाती घ्याल तर सोडणार नाही

खबरदार ! कायदा हाती घ्याल तर सोडणार नाही

Next
ठळक मुद्देपोलीस आयुक्त : मिशन विधानसभा निवडणूक

वैभव बाबरेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकसभा शांततेत पार पाडली, सण-उत्सवात कायदा व सुव्यवस्था राखली, आता विधानसभा निवडणुकीचे आव्हान पेलण्यास पोलीस सज्ज आहेत. निवडणूक पारदर्शक व निर्भयपणे होण्यासाठी आता लक्ष केंद्रित केले आहे. कुणीही कुठल्याही प्रकारे शांतता भंग केल्यास गय केली जाणार नाही. कायदा हाती घेणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा इशारा पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी दिला.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सीपी संजयकुमार बाविस्कर यांच्याशी 'लोकमत'ने संवाद साधला असता, जनसामान्यांमध्ये विश्वास संपादन करू, त्यांच्या सहकार्याने विधानसभा निवडणुकीचे मिशन यशस्वी करू व गुन्हेगारीवर वचक ठेवू, असे ते म्हणाले. निवडणूक भारतीय लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा अंग आहे. हा राष्ट्रीय कार्यक्रम शांततेत पार पाडण्याची संपूर्ण व्यवस्था केली आहे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली आहे. कुठल्याही दबावाला बळी न पडता, मतदान करावे. ऐतिहासिक, सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानीत राहत असल्याचा अभिमान बाळगून मतदान करा, असे आवाहन सीपी बाविस्कर यांनी केले आहे.

सहावर एमपीडीए, दोनचा प्रस्ताव
लोकसभा, गणेशोत्सव, दुर्गात्सोव व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील सराईत व धोकादायक सहा गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीएची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय पोलीस आयुक्तांनी स्वत:च्या नेतृत्वात आॅपरेशन राबवून आरोपींकडून नऊ देशी कट्टे व १३ जिवंत काडतूस जप्त केले. अमरावतीच्या इतिहासात ही पहिलीच मोठी कारवाई ठरली आहे.

२७ पथकांची करडी नजर
शहरातील ७३५ बुथपैकी १७७ संवेदनशील आहे. निवडणूकीत फ्लार्इंग स्कॉड, व्हिडीओ सर्व्हेलन्स व एसएसटी असे २७ पथके २४ तास वाहनांची तपासणी करून घातक शस्त्रे, पैसे, अवैध दारूविषयी कारवाई करीत आहे. डीसीपी प्रशांत होळकर, यशवंत सोळंके, शशिकांत सातव नेतृत्वात तीन पथके सुध्दा सज्ज आहे.

तडीपारांचे चेहरे ओळखा
गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतून ९८ आरोपींना आतापर्यंत तडीपार केले आहे, तर १२ प्रस्ताव कारवाईच्या प्रक्रियेत आहे. त्यांची छायाचित्रे चौका-चौकात लावण्यात आले. तडीपार नजर चुकवून शहरात धुडघुस घालतात. त्यांची ओळख व माहिती नागरिकांना नसते. त्यांचे चेहरे व नावे जनसामान्यांना माहिती पडावे, यासाठी पोस्टर लावण्यात आले आहे. तडीपारांना ओळखून माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी केले.

पैशांच्या व्यवहारावर लक्ष
पैशांच्या व्यवहारावर पोलीस लक्ष ठेवून आहेत. आचारसंहितेमुळे सद्यास असे प्रकार घडले नाही. कुणालाही काही माहिती असल्यास त्यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास पुडंकर यांच्या ९३०९८३५३३१ यावर सपर्क साधावा.

Web Title: Beware! If you take the law, it will not go away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.