शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

सावधान, 'फेक न्यूज', आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ शेअर कराल तर..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 13:18 IST

Amravati : सोशल मॉनिटरिंग सेलचा वॉच, सायबर पोलिस २४ बाय ७ सजग

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. ऑनलाइन तथा सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरविणाऱ्या 'फेक न्यूज', फेक पोस्ट व जातीय तेढ निर्माण करू पाहणाऱ्यांवर सायबर पथकाचे विशेष लक्ष राहणार आहे. पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी गुरुवारी प्रसिद्धिमाध्यमांना ही माहिती दिली. 

दोन समाजांत तेढ निर्माण होईल, धार्मिक, जातीय भावना दुखावतील अशा पोस्ट, व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित होत असल्याने कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागपुरी गेट पोलिस ठाण्यावर झालेली दगडफेक अशाच फेक व्हिडीओ पोस्टचा परिपाक ठरला. चुकीची माहिती पसरविणाऱ्या 'फेक न्यूज'ही काही जणांकडून पसरविल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने ऑनलाइन फेक न्यूज, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करणान्यांवर सायबर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. 

सायबर पोलिस स्टेशनमधील सोशल मॉनिटरिंग सेलच्या माध्यमातून देखील फेक न्यूज व सोशल मीडियावरील पोस्टवर लक्ष ठेवले जात आहे. सायबर ठाण्याच्या पोलिस निरीक्षक दीप्ती ब्राह्मणे व सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत कासार यांची टीम त्यासाठी कार्यरत आहे. 

फेक न्यूजसंदर्भात तक्रार कोठे कराल? आपत्तीकारक मजकूर किवा फेक न्यूजसंदर्भात तक्रार करायची असेल तर ती स्थानिक पोलिस ठाणे किंवा सायबर पोलिस ठाणे येथे करता येते. यासोबतच डायल ११२ सह निवडणूक प्रशासनाच्या सी-व्हिजिल अॅपवरही फेक न्यूज व आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार करता येते.

शहर आयुक्तालयात सोशल मॉनिटरिंग सेल पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या नेतृत्वात सायबर पोलिस ठाण्यात सोशल मॉनिटरिंग सेल कार्यान्वित करण्यात आला आहे. तो सेल सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टवर लक्ष ठेवून आहे. एक अधिकारी, एक कर्मचारी त्यासाठी २४ तास नेमण्यात आले आहेत.

निवडणुकीच्या काळात विशेष लक्ष निवडणूक काळात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, कोणत्याही प्रकारचे चुकीचे मेसेज किंवा फेक न्यूज व्हायरल होऊन सामाजिक शांतता भंग होऊ नये, यासाठी सायबर पोलिस स्टेशनचे विशेष लक्ष राहणार आहे. त्यामुळे एखादी चुकीची बातमी पसरवणे धोक्याचे ठरू शकते.

लोकसभेवेळी आचारसंहितेचे दोन गुन्हे दाखल अद्याप फेक न्यूज वा सोशल मीडियावरील पोस्टबाबत कुठलीही तक्रार वा गुन्हा दाखल झालेला नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवणगाव व स्थानिक ओसवाल भवन येथील दोन कार्यक्रमांच्या अनुषंगाने अनुक्रमे नांदगाव पेठ व राजापेठ पोलिस ठाण्यात आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तर फौजदारी कारवाई "खोटी माहिती पसरवल्यास, फेक न्यूज शेअर केल्यास भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसारसुद्धा कारवाई केली जाते. फेक न्यूज व एकंदरीतच सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी सोशल मॉनिटरिंग सेल कार्यान्वित करण्यात आला आहे."- नवीनचंद्र रेड्डी, पोलिस आयुक्त

टॅग्स :Fake Newsफेक न्यूजElectionनिवडणूक 2024Code of conductआचारसंहिताAmravatiअमरावती