शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

नातेवाईकांना लाभ, १.२० कोटींचा घोटाळा? लहाळेंवर गंभीर आरोपांची मालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 13:26 IST

Nagpur : ४० दिवसांवर सेवानिवृत्ती, पण भ्रष्टाचार प्रकरणांमुळे लहाळेंच्या अडचणीत भर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विभागीय कृषी सहसंचालक (जेडीए) प्रमोद लहाळे यांच्या अनियमित व भ्रष्ट कारभारासंदर्भात लोकमतने प्रसिद्ध केलेल्या वृत्तमालिकेच्या पार्श्वभूमीवर शासन हालचालींना वेग आला आहे. या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी कृषी आयुक्त तसेच प्रधान सचिव (कृषी) यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. याची गंभीर दखल घेत प्रधान सचिवांनी २४ तासांत सविस्तर अहवाल मागवला आहे.

या चौकशीसाठी कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी अकोल्याच्या बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे संचालक अंकुश माने यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून, १५ दिवसांत मुद्देसूद अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रमोद लहाळे यांनी वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असताना नातेवाइकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, वर्ग-४ पेपरफूट प्रकरणातील सहभाग, निवडणूक आयुक्तांचे आदेश डावलून बदल्या करणे, १.२० कोटींचा किट खरेदीत भ्रष्टाचार, वसुलीच्या बदल्या आदी गंभीर आरोप आमदार धस यांच्या तक्रारीत नमूद आहेत. लहाळे यांच्या सेवानिवृत्तीस अवघे ४० दिवस उरले. 

काय आहेत चौकशीचे आदेश?राज्य शासनाचे कार्यासन अधिकारी विशाल टेके यांनी १९ जून रोजी कृषी आयुक्त पुणे यांना पत्र पाठवून, लहाळे यांच्यावरील आरोपांची सविस्तर वस्तुस्थिती व प्रस्ताव २० जूनपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या पत्रात प्रधान सचिव (कृषी) यांच्या स्पष्ट सूचना नोंदवण्यात आल्या आहेत. असताना चौकशीच्या हालचालींमुळे त्यांची अडचण वाढली आहे. दरम्यान, ते दोन दिवसांपासून मुंबई-पुणे दौऱ्यावर असल्याचे समजते.

टॅग्स :AmravatiअमरावतीSuresh Dhasसुरेश धस