भारतीय बौद्ध महासभेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:12 AM2021-04-16T04:12:00+5:302021-04-16T04:12:00+5:30

अमरावती : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालय, भारतीय बौद्ध महासभा (बडनेरा ...

On behalf of the Indian Buddhist Congress, Dr. Greetings to Babasaheb Ambedkar | भारतीय बौद्ध महासभेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

भारतीय बौद्ध महासभेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

googlenewsNext

अमरावती : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालय, भारतीय बौद्ध महासभा (बडनेरा - अमरावती महानगर) च्यावतीने अभिवादन करण्यात आले.

वाचनालयाचे अध्यक्ष प्रकाश बोरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. समता चौक तसेच नवी वस्तीतील अशोकनगर येथील स्मारकावरदेखील भारतीय बौद्ध महासभेचे जी.एस. घरडे, आनंदराव डोंगरे, सचिव व्ही.एस. मेश्राम, वंचित बहुजन महिला आघाडीच्या शहराध्यक्ष पुष्पा बोरकर यांनी अभिवादन केले. समता सैनिक दलाचे मार्शल सुरेश दहाटे यांच्या पथकाने युगप्रवर्तकाला मानवंदना दिली. याप्रसंगी शांताराम गेडाम, राहुल शेंडे, शिरीष भालेराव, प्रकाश बागडे, सुरेश बोरकर, परमानंद वासनिक, बाळू बनसोड, के.टी. मेश्राम, दलितमित्र उत्तमराव भैसने, प्रमोद भालेराव, सुखदेव श्रुंगारे, के.डी. सांभारे, प्रल्हाद इंगळे, विश्वनाथ कोकणे आदींनी शिस्तबद्ध पद्धतीने पथसंचलन करून महामानवाला अभिवादन केले.

Web Title: On behalf of the Indian Buddhist Congress, Dr. Greetings to Babasaheb Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.