तिवसा तहसीलवर मधमाशांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 10:36 PM2018-03-21T22:36:33+5:302018-03-21T22:36:33+5:30

तहसील कार्यालयावर लागलेल्या पोळातील मधमाशांनी २१ मार्च रोजी दुपारी १ वाजता अचानक हल्ला चढविल्याने तलाठी, ग्रामसेवकासह चार जण जखमी झाले. त्यांच्यावर तिवसा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Bees attack on Tivasa tehsil | तिवसा तहसीलवर मधमाशांचा हल्ला

तिवसा तहसीलवर मधमाशांचा हल्ला

googlenewsNext
ठळक मुद्देअनेकांना चावा : तलाठी, ग्रामसेवकासह चार जखमी

आॅनलाईन लोकमत
तिवसा : तहसील कार्यालयावर लागलेल्या पोळातील मधमाशांनी २१ मार्च रोजी दुपारी १ वाजता अचानक हल्ला चढविल्याने तलाठी, ग्रामसेवकासह चार जण जखमी झाले. त्यांच्यावर तिवसा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तिवसा प्रशासकीय इमारतीवर दोन ठिकाणी गेल्या चार महिन्यांपासून आग्यामोहाचे पोळे लागले आहे. बुधवारी कार्यालयाच्या दर्शनी भिंतीवरील खिडकीनजीक असलेल्या आग्यामोहाने एकाएकी हल्ला केला. यावेळी तहसीलदार राम लंके यांनी रोहयो पांदण रस्त्याबाबत ग्रामसेवक व तलाठ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला जाणारे ग्रामसेवक सुरेश इंगळे, तलाठी प्रल्हाद पटके तसेच सातरगाव येथील रामकृष्ण वाटकर व अमरावतीवरून आलेले सुनील शर्मा दाम्पत्य मधमाशांच्या हल्ल्यात सापडले. घटनास्थळी तिवसा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश जाधव यांनी धाव घेतली होती.

Web Title: Bees attack on Tivasa tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.