शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

पोलिसांना मारहाण, वाहनावर दगडफेक; एपीआयवर उगारला चाकू

By प्रदीप भाकरे | Updated: December 30, 2022 17:03 IST

चांगापूर फाट्याजवळची घटना : आरोपींच्या पाठीराख्यांचा प्रताप, तिघांना अटक

अमरावती : पोस्को व विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीला घेऊन ठाण्यााकडे येत असलेल्या गाडगेनगर पोलिसांशी वाद घालून त्यांना मारहाण करण्यात आली. तर, पैकी एकाने पोलीस निरीक्षकावर चाकू उगारला. प्रसंगावधान राखून तो वार चुकविण्यात आला. हल्लेखोरांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. ही खळबळजनक घटना २९ डिसेंबर रोजी रात्री चांगापूर फाट्यावर घडली. आरोपीच्या पाठीराख्यांनी हा प्रताप केला. या हल्ल्यात सहायक पोलीस निरिक्षक, उपनिरीक्षकांसह तीन पोलिस अंमलदार जखमी झाले आहेत.

गाडगेनगर पोलिसांनी याप्रकरणी चेतन कोटेचा, सौरभ वानखडे, सैय्यद इमरान अली मुमताज अली, सैय्यद इरफान अली मुमताज अली, सचिन घोंगडे (रा. महेन्द्र कॉलनी), श्रीकांत सावळीकर (३०, रा. वलगाव) यांच्यासह दहा ते बारा जणांविरुध्द गुन्हा दाखल केला. पैकी तिघांना अटक करण्यात आली. गाडगेनगर ठाण्यात २३ डिसेंबर २०२२ रोजी एका अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरुन अनोळखी मुलाविरुध्द गुन्हा दाखल झाला.

दरम्यान गुरूवारी सांयकाळी सैय्यद इमरान अली मुमताज अली हा या प्रकरणातील आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे गाडगेनगरचे पोलीस उपनिरिक्षक पंकज ढोके, सहायक पोलीस निरिक्षक महेश इंगोले, हेड कॉन्स्टेबल ईशय खांडे, गजानन बरडे आणि आस्तिक देशमुख हे पथक गुरूवारी रात्री आरोपीच्या शोधात निघाले. दरम्यान तो वलगाव येथील एका रिसोर्ट येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी गुरूवारी रात्री ते रिसोर्ट गाठले. यावेळी सर्व पोलीस साध्या गणवेषात व खासगी वाहनाने गेले होते. त्यांनी सिकची रिसोर्टवरुन सैय्यद इमरान अलीला ताब्यात घेतले आणि ते ठाण्याकडे निघाले.अशी घडली घटना

गाडगेनगर पोलिसांनुसार, गुरूवारी रात्री १२ च्या सुमारास चांगापूर फाट्याजवळ एक चारचाकी वाहन पोलिसांच्या वाहनासमोर आले. त्यांनी पोलिस वाहन थांबवले. त्यावेळी दहा ते बारा जण पोलिसांसमोर उभे ठाकले. कोटेचा व अन्य व्यक्तींनी मोबाईलमध्ये शुटींग केले. तुम्ही त्याला कसे घेवून निघाले, तुमच्याकडे वॉरंट आहे का? अशी विचारणा करत पोलिसांच्या खासगी वाहनाची चाबी काढून घेतली. त्यानंतर त्यांनी आरोपीला सोडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपी काही दूर पळाला मात्र पोलिसांनी त्याला पकडले. यावेळी पोलिस व आरोपीला सोडवायला आलेल्या व्यक्तींमध्ये जोरदार वाद झाला. त्यावेळी चेतन कोटेचा व ईतरांनी एपीआय इंगोले व इतर पोलिसांना मारहाण सुरू केली.अतिरिक्त कुमक मागविली

तेथे अतिरिक्त पोलिस ताफा बोलावण्यात आला. तो ताफा दिसताच हल्लेखोर घटनास्थळावरुन पळत होते. त्याचवेळी हल्ला परतवून लावण्यासाठी पोलिस कारच्या मागे असता कारवर दगडफेक केली. त्यानंतर सैय्यद इमरान अली याच्यासह श्रीकांत सावळीकर आणि सचिन घोंगडे यांना अटक केली. या प्रकरणी पीएसआय ढोके यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सर्व आरोपींविरुध्द शासकिय कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे, दंगा करणे यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.खासगी वाहन कसे?

परजिल्ह्यात वा परप्रांतातून आरोपीला आणायचे असल्यास खासगी वाहन घेतले जाते. मात्र, येथे हद्दीनजिकच्या ठिकाणी आरोपी असल्याची पक्की खबर असताना त्याला आणण्यासाठी खासगी वाहन का घेतले गेले, त्याबाबत स्टेशन डायरीवर नोंद घेण्यात आली का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे संशयकल्लोळ निर्माण झाला असताना एका पोलीस अंमलदाराच्या ‘हावरट’पणामुळे कालचा बाका प्रसंग उद्भवल्याची चर्चा झडत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAmravatiअमरावती