अमरावती : कोरोना विषाणूचे संक्रमण टाळण्याकरिता जिल्ह्यात संचारबंदी सुरू आहे. त्याबाबत सारासार विचार न करता काही नागरिक रविवारीदेखील छत्री तलाव मार्गावर फिरायला गेले. रविवारी पहाटेपासून अशा व्यक्तींना राजापेठ पोलिसांनी दंडुक्यांचा प्रसाद दिला. अनेकांना पोलीस वाहनात बसवून राजापेठ ठाण्यात नेण्यात आले. महिला व लहान मुले वगळता पुरुषांना या कारवाईला सामोरे जावे लागले. पोलिसांनी सात प्रकरणांमध्ये २५ जणांवर भादंविचे कलम १८८ अन्वये गुन्हे नोंदविले. काहींनी कारवाईपासून वाचण्यासाठी जंगल जवळ केले.
‘हेल्थ कॉन्शस’वर पुन्हा दंडुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 05:01 IST