शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

सावधान : इंडो पब्लिक स्कूल परिसरात चार बिबट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 22:13 IST

वडाळी वनपरिक्षेत्रातील मार्डी रोडस्थित इंडो पब्लिक स्कूलच्या मागील परिसरात मादी बिबटासह तीन छाव्यांचा वावर आढळून आला. त्यामुळे जगंलाशेजारील शाळा-महाविद्यालये, पोल्ट्रीफार्म, गोटफार्म व शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.

ठळक मुद्देवनविभागाला पाचारण : शिक्षक, शाळकरी मुलांनी सावध राहण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वडाळी वनपरिक्षेत्रातील मार्डी रोडस्थित इंडो पब्लिक स्कूलच्या मागील परिसरात मादी बिबटासह तीन छाव्यांचा वावर आढळून आला. त्यामुळे जगंलाशेजारील शाळा-महाविद्यालये, पोल्ट्रीफार्म, गोटफार्म व शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.मार्डी रोड परिसरात वन्यप्राण्यांचा वावर आहे. आठवडाभरापूर्वी इंडो पब्लिक स्कूलच्या मागील तारेच्या कुंपणानजीकच मादी बिबटासह तीन छावे मुक्तसंचार करताना आढळले. याची माहिती मिळताच वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी महेश धंदर, वनपाल विनोद कोहळे, रेस्क्यू पथकातील वनरक्षक अमोल गावनेर व एका वनमजुराने इंडो पब्लिक स्कूल परिसरात पाचारण केले. पाण्याच्या व शिकारीच्या शोधात असलेल्या बिबटांना वनकर्मचाºयांनी जंगलात हाकलून लावले. वन्यप्राणी शाळेच्या आवारापर्यंत पोहोचल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, यासंबंधाने शाळा प्रशासन व पालकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. बिबट हा मांजरवर्गीय प्रजातीचा वन्यप्राणी असून तो श्वान व पाण्याच्या शोधात मानवी वस्तीपर्यंत पोहचू शकतो. इंडो पब्लिक स्कूलच्या आवाराला चार ते पाच फुटांचे तारेचे कुंपण आहेत. मात्र, त्या कुंपणातून बिबट आत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने वनविभाग सतर्क झाला असून, वन्यप्राण्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी वनविभागाने शाळा प्रशासनासह जंगलशेजारी राहणाºयांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.बिबट मांजरवर्गीय वन्यप्राणीवाघ, बिबट, रानमांजर हे मांजरवर्गीय वन्यप्राणी असून, बिबट हा शिकारीच्या शोधात चार ते पाच फुटापर्यंत सहज उडी घेऊ शकतो. त्यामुळे शाळेच्या आवारात बिबट येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे वनकर्मचारीही सांगत आहे. विशेष म्हणजे बिबटचे आवडते खाद्य श्वान, रानडुक्कर, बकरी, कोंबड्या, ससे आहेत. मोठ्या प्राण्यांवर सहज अटॅक करता येत नसल्यामुळे लहान प्राण्यांना बिबट भक्ष्य बनवितो.हे ठिकाण वनविभागाच्या निगराणीतइंडो पब्लिक स्कूल परिसरात बिबट आढळल्याने वनविभागाने या परिसरात गस्त वाढविली. जगंलाशेजारची घरे, शेती, फार्महाऊस येथे जाऊन तेथील रहिवाशांंना वन्यप्राण्यांपासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मार्डी रोड स्थित जंगलाशेजारी इंडो पब्लिक स्कूल, के.के. कॅमरेज, सेंट जार्ज शाळा, मंदिर, चर्च, अच्यूत महाराज हार्ट हॉस्पिटल व इंजिनीअरिंग कॉलेज आहे.गोटफार्मचीही बकरी फस्तबिबटाने दोन दिवसांपूर्वी एका शेतातील गोटफार्ममधील बकरी फस्त केली. अजय लहाने यांच्या शेतात हा प्रकार घडल्याचे वनकर्मचारी सांगत आहे. वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा करून शेतकºयाला नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.अशा आहेत वनविभागाच्या सूचनावन्यप्राणी पाणी व शिकारीच्या शोधात बिबट या परिसरात येत असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. वन्यप्राणी दिसताच श्वानांचे भुंकणे सुरु होते. अशावेळी कर्कश आवाज किंवा फटाके फोडून वन्यप्राण्यांना हाकलून लावले जाऊ शकते. सायंकाळनंतर परिसरात बॅटरीचा प्रकाश केल्यास व लाईट सुरू ठेवल्यास वन्यप्राणी प्रकाशामुळे आत येणार नाही. पाळीव प्राण्यांच्या शिकारीसाठी बिबट आत येऊ शकतात. सायंकाळनंतर घराबाहेर पडू नका, वन्यप्राण्यांना हुसकावून लावू नका, वन्यप्राणी दिसल्यास तत्काळ वनकर्मचाऱ्यांनी तेथील रहिवाशांना दिलेल्या मोबाईल क्रमांकावर कॉल करावे. सायंकाळी ७ ते रात्री १० पर्यंत वन्यप्राणी बाहेर पडत आहे. अशावेळी सावध राहावे. आदी सूचना वनविभागाने तेथील रहिवाशांना दिल्या आहेत.या परिसरात बिबट आढळल्याचा कॉल होता. वनकर्मचाºयांनी आढावा घेऊन नागरिकांना सावध राहण्याची सूचना केली. दिवसा लोकांच्या गर्दीमुळे बिबट येण्याची शक्यता कमी असते. सायंकाळनंतर नागरिकांनी बाहेर पडू नये.- हेमंत मीणा, उपवनसरंक्षकशाळा परिसरात मादीसह तीन बिबट आढळले होते. शाळा प्रशासनाने व वनविभागाने काळजी घेणे आवश्यक आहे. शाळेने पाळीव प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवावी. मुलांच्या डब्ब्यातील टाकाऊ अन्न पदार्थांची योग्य विल्हेवाट लावावी.- स्वप्निल सोनोने, वन्यजीव अभ्यासक