शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

वाघांच्या जीवावर उठल्या बावरिया टोळ्या; विदर्भात सक्रिय; आसाम, हरयाणा, तेलंगणा ते पंजाबपर्यंत कनेक्शन

By गणेश वासनिक | Updated: July 29, 2023 05:48 IST

राज्यात सर्वाधिक वाघ असलेल्या विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांवर आंतरराज्यीय तस्करांची नजर आहे.

अमरावती : राज्यात सर्वाधिक वाघ असलेल्या विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांवर आंतरराज्यीय तस्करांची नजर आहे. नजीकच्या गावांतील स्थानिकांना हाताशी धरून बावरिया टोळ्या शिकारी करत असल्याचे उघड झाले आहे. दिल्ली येथील वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोच्या अलर्टनुसार देशासह विदर्भातील मेळघाट, ताडोबा-अंधारी, पेंच, बोर, टिपेश्वर, नवेगाव- नागझिरा या अभयारण्यात वाघ तस्करीचे संकेत दिले आहेत. 

ब्युरोच्या निर्देशानुसार मेळघाट आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर व गडचिरोली आणि गडचिरोलीजवळच्या आंबेशिवणी येथे काही ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने धाडसत्र राबविले. त्यात शिकारीच्या साहित्यासह संशयित सहा पुरुष, पाच महिला, पाच लहान मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र, आता आसाम, हरयाणा, तेलंगणा ते पंजाब राज्यातील बावरिया टोळीने वाघ तस्करीचे जाळे पसरले आहे. 

व्याघ्र प्रकल्पातील गावांचे पुनर्वसन आवश्यक

 व्याघ्र प्रकल्पातील गावांचे पुनर्वसन रखडल्याने वाघांचे संवर्धन, संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  मेळघाट व्याघ्र प्रकल्पात अद्यापही १० गावांचे पुनर्वसन झाले नसून ५५ कोटी निधीची गरज आहे. पेंचमध्ये ११० लोकसंख्येच्या फुलझरी या गावचे पुनर्वसन रखडले आहे. 

 ५७ जणांचा पुनर्वसनाला नकार आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील २४४ कुटुंबे संख्या असलेल्या रानतडोदी या गावचे पुनर्वसन थांबले आहे.

पुनर्वसनास निधीची कमतरता नाही

व्याघ्र प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनासाठी निधीची कमतरता नाही. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आतापर्यंत पाच गावांचे पुनर्वसन झाले आहे. एकमात्र रानतडोदी हे गाव राहिले असून, पावसाअभावी ते थांबले आहे.     - जितेंद्र रामगावकर, क्षेत्र संचालक, ताडोबा-अधारी     व्याघ्र प्रकल्प

टॅग्स :TigerवाघAmravatiअमरावती