शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

परतवाड्यात १७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा पकडला, १४ चाकी ट्रक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 17:46 IST

परतवाड्याकडे येत असलेल्या ट्रकमधून पोलिसांनी जवळपास १७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा पकडला. या कारवाईत पोलिसांनी ट्रकसह एकूण ४१ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ठळक मुद्देअचलपूर एसडीपीओची कारवाई

अमरावती : दिल्लीवरून बैतूलमार्गे परतवाड्याकडे येत असलेला १६ लाख ९५ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा असलेले पन्नास पोते वाहून आणणारा १४ चाकी ट्रक पोलिसांनी पकडला. आरजे ११ जीबी ८५९३ क्रमांकाच्या ट्रकसह एकूण ४१ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

गोपनीय माहितीच्या आधारे, अचलपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा परीविक्षाधीन अधिकारी गौहर हसन यांनी ही कारवाई केली. यादरम्यान त्यांना पोलीस कॉन्स्टेबल शेख गणी व विराज ठाकूर यांनी सहकार्य केले. मंगळवारी मध्यरात्रीनंतर दीड वाजताच्या सुमारास बैतूल-परतवाडा मार्गावरील बैतूल नाक्यासमोरील स्मशानघाटालगत हा ट्रक ताब्यात घेतला.

परतवाडा पोलीस ठाण्याच्या आवारात ट्रक लावल्यानंतर झडती घेतली असता त्यात ''वाह'' नामक गुटख्याचे पन्नास पोती आढळून आली. ही पोती ट्रकच्या मधोमध ठेवून त्याच्या आजूबाजूला व वर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे बॉक्स ठेवण्यात आले होते. यामुळे या पोत्यांचा अंदाज येणेही शक्य नव्हते. पायलटिंग करणारी कार (एमएच ४३ डी ८३४४) ट्रकच्या पुढे मार्गस्थ होती. ही बाब लक्षात येताच आयपीएस गौहर हसन यांनी ही कारही परतवाडा पोलीस ठाण्यात उभी केली. या कारमधून प्रवास करणाऱ्या अचलपूर येथील तीन व्यक्तींना रात्रभर पोलीस स्टेशनला डिटेन करून ठेवण्यात आले.

चालक ताब्यात

ट्रकचालक रामभरण धाकड व क्लीनरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पकडलेल्या प्रतिबंधित गुटख्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला दिली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गुटख्याची खेप अमरावतीला?

ट्रकचालकाच्या सांगण्यानुसार, हा गुटखा अकोल्याकडे जात होता. या पोत्यांमध्ये प्रतिबंधित गुटखा असल्याची माहिती नव्हती, तर सुगंधी पदार्थ असल्याचे ट्रक भरताना सांगितले गेल्याचे तो म्हणाला. काहींच्या मते हा गुटखा अमरावतीला उतरविला जाणार होता. पुढील तपास परतवाडा ठाणेदार संतोष ताले व त्यांचे सहकारी करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTobacco Banतंबाखू बंदी