शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
3
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
4
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
5
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
6
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
7
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
8
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
9
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
10
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
11
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
12
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
13
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
14
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
15
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
16
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
17
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
18
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
19
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
20
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

पश्चिम विदर्भातील बँकांनी ३५ टक्क्यांवरच गुंडाळले पीककर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 19:45 IST

शासनादेश झुगारला : दोन दिवसांत कसे करणार ५,३६० कोटींचे वाटप?

- गजानन मोहोड, लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीप हंगामासाठी विभागातील बँकांना ८२६३.८१ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना बँकांनी सद्यस्थितीत २९०३.८० कोटींचे कर्जवाटप केले, ही ३४.८४ टक्केवारी आहे. खरीप कर्जवाटपाला दोन दिवस बाकी असताना उर्वरित ५,३६० कोटींचे कर्जवाटप करणे अशक्य आहे. बँकांनी शासनादेश झुगारून कर्जवाटप गुंडाळल्याचे स्पष्ट झाले आहे. बँकांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी अडचणीत आलेले असल्याने पुन्हा अवैध सावकारी बोकाळणार असल्याचे वास्तव आहे.यंदाच्या खरिपासाठी एक एप्रिलपासून पीक कर्जवाटपाला सुरूवात झाली. प्रत्यक्षात वाटपाला जून महिन्यापासून सुरू झाले. पेरणीच्या काळात कर्जवाटपाचा टक्का माघारला असल्याने विभागातील अमरावती, अकोला व यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कर्जवाटपात सहकार्य न करणाऱ्या बँकांचे जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित खातेच बंद केलेत. त्यामुळे बँकांनी जुलै महिन्यात वाटपाचा टक्का वाढविला. मात्र, ऑगस्टनंतर पुन्हा कर्जवाटप माघारल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. कर्जमाफीचा घोळ निस्तरलेला नाही. विभागात अद्याप तीन लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत, तर थकबाकीदार असल्याने बँकाही कर्ज देत नाहीत. आता बँकांनी खरिपाचे कर्जवाटपच बंद केले असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

 राष्ट्रीयीकृत, ग्रामीण बँका कर्जवाटपात माघारल्यायंदाच्या कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँका माघारल्या आहेत. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांनी ५२६० कोटींचे कर्जवाटप लक्ष्यांकाच्या तुलनेत १,३२,४६५ शेतकऱ्यांना ११७२ कोटींचे वाटप केले, ही २२.२८ टक्केवारी आहे. ग्रामीण बँकांना ७४७ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना हंगामाअखेर १३,८८४ शेतकऱ्यांना ११३ कोटींचे वाटप केले. ही ३४.८४ टक्केवारी आहे. जिल्हा बँकांना २२५६.३६ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना आतापर्यंत १,७८,४११ शेतकऱ्यांना ९६६.६१ कोटींचे कर्जवाटप केले, ही ४२.६१ टक्केवारी आहे. यवतमाळ व बुलडाणा जिल्हा बँकेचे वाटप उल्लेखनीय राहिले.

विदर्भ व मराठवाड्यातील बँकांचा खरीप कर्जवाटपात असहकार राहिला. अत्यंत कमी कर्जवाटप झाल्याने तोडगा काढण्यासाठी ‘एसएलबीसी’सोबत शुक्रवारी बैठक होऊ घातली आहे. शेतकऱ्यांनी कर्जवाटपासंबंधी तक्रारी माझ्या वॉट्स अ‍ॅप क्रमांकावर पाठवाव्यात.- किशोर तिवारी, अध्यक्ष, शेतकरी स्वावलंबन मिशन

टॅग्स :Crop Loanपीक कर्जVidarbhaविदर्भbankबँकMaharashtraमहाराष्ट्र