शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात तीन महिन्यांत ६० बालमृत्यू, आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 19:33 IST

धारणी(अमरावती) : मेळघाटातील धारणी तालुक्यात गत तीन महिन्यांत ६० बालकांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले.

धारणी(अमरावती) : मेळघाटातील धारणी तालुक्यात गत तीन महिन्यांत ६० बालकांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. यामुळे शासन स्तरावरून चालविण्यात येणा-या योजना मेळघाटात कुचकामी ठरल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. एकात्मिक बाल विकास प्रकल्पातून मिळालेल्या माहितीनुसार, मागील तीन महिन्यात शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालमृत्यूचे प्रमाण पाहिल्यावर ते लक्षात येते.सप्टेंबर महिन्यात २२, आॅक्टोबर २८, तर नोव्हेंबरमध्ये १० बालकांचा मृत्यू झाला. मेळघाटात आरोग्य यंत्रणेने चांगले काम करावे, यासाठी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी अनेक दौरे केले. नागरिकांशी संवाद साधला. टेली मेडिसिन सेवा सुरू केली. आरोग्य यंत्रणेने मेळघाटातील प्रत्येक गावात जाऊन सेवा द्याव्यात, असे आदेशही दिले. मात्र, डॉक्टरांची कमतरात, दुर्गम भाग व अज्ञान यामुळे कुपोषणावर तोडगा काढण्यात शासन व प्रशासन अपयशी ठरले आहे. येथे कार्यरत असलेल्या डॉक्टरांच्या व आशा सेविकांच्या कामावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.अंगणवाडी सेविकांची मोठी भूमिकामेळघाटात आरोग्यासंदर्भात जनजागृती करण्यात अंगणवाडी सेविकांचा मोठा वाटा आहे. मेळघाटात काही ठिकाणी बालकांना व गर्भवतींना पोषण आहार पुरविण्याचे काम अंगणवाडी सेविकांकडे आहे. यासोबतच अंगणवाडी सेविका आरोग्यसेवा सुधारण्यात पुढाकार घेतात. २४ दिवस अंगणवाडी सेविकांचा संप सुरू होता. या काळात मेळघाटात आरोग्याविषयी जनजागृती झाली नाही, हे बालमृत्यूच्या प्रमाणावरून दिसते.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बालमृत्यूच्या प्रमाणात घट झाली आहे. मागील महिन्यांची आकडेवारी अद्याप माझ्यापर्यंत पोहोचली नाही. मात्र, याबाबत विचारणा करून पावले उचलू.- शरद जोगी,तालुका आरोग्य अधिकारीअंगणवाडी सेविकांकडे अनेक कामे असतात. आता तर निवडणुकीचे कामही लावले आहे. अंगणवाडी सेविका सामाजिक भान जपून काम करीत असल्याने मेळघाटातील परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात शासनाला यश आले आहे.- बी. के. जाधव,महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी संघ (आयटक)

टॅग्स :Amravatiअमरावती